इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

कै. जनार्दन आत्माराम चितळे युवा नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

 कै. जनार्दन आत्माराम चितळे युवा नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


.......

नांदेड, प्रतिनिधी ...

नांदेड येथे तन्मय प्रतिष्ठान व लीला आर्ट्स फाउंडेशन, नांदेड यांच्या वतीने कै. जनार्दन आत्माराम चितळे युवा नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दिनांक 22 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. यावर्षीच्या आयोजनाचे हे 34 वे वर्ष आहे. या नाट्य शिबिरात नाट्यक्षेत्रातील सर्वोच्च शिक्षण देणाऱ्या राष्ट्रीय नाट्य शाळा ( एनएसडी, नवी दिल्ली) येथील तज्ञ नाट्य प्रशिक्षक श्रीमती स्नेहलता तागडे( मुंबई) ,श्रीमती खुशबू कुमारी (बिहार), चंदन कुमार ( दिल्ली), सलीम हुसेन मुल्ला (कोल्हापूर), तसेच सोशल मीडियावर नाट्यतंत्रासाठी सुप्रसिद्ध प्रशिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या शिखर पहाडिया थिअटरवाले, दूरदर्शन व चित्रपट क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री नांदेडची भूमिकन्या  नुपूर चितळे या व्याख्यात्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. हे शिबिर रंग शारदा दालन, कै. शंकरराव चव्हाण नाट्यगृह नांदेड येथे पार पडणार आहे. तरी मराठवाड्यातील जास्तीत जास्त युवा नाट्यकर्मी, तसेच या क्षेत्रामध्ये काम करू इच्छिणाऱ्या युवक व युवतींनी या शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ रंगकर्मी नाथा चितळे यांनी केले आहे.

या नाट्य प्रशिक्षण शिबीरामध्ये नाटकातील विविध अंगांची ओळख, संहिता नाट्यलेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच चित्रपट व दूरदर्शन मालिकांमध्ये अभिनय, ऑडिशनच्या तयारीसाठी मार्गदर्शन मिळणार आहे.  या शिबिराच्या अधिक माहितीसाठी नितीश देशपांडे 98 90 91 47 29, अभिजीत बारडकर 90 21 20 57 54 , व शिबीर प्रमुख नागेश रोकडे 73 78 91 77 01 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या