परळीत बिंगोवर धाड: ४० हजारांचा मुद्देमाल जप्त

 परळीत बिंगोवर धाड: ४० हजारांचा मुद्देमाल जप्त 


परळी (प्रतिनिधी)...

      नवीन पोलिस अधिक्षक बारगळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंदयांवर जिल्ह्यात धाडस्त्र सुरू केले आहे. त्यानुसार परळी येथील चक्री जुगार अड्डड्यावर छापा मारून बिंगो जुगार साहित्यासह रोख रक्कम जप्त केली आहे.

         परळी शहरातील संभाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत ऑनलाइन बींगो चक्री खुलेआम सुरू असल्याची माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखा बीड पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या आदेशावरून दिनांक १६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता इशारातील संभाजीनगर भागामध्ये सुरू असलेल्या ऑनलाईन बिंगो चक्रीवर धाड मारून एका व्यक्तीसह लॅपटॉप सीपीयू सह ऑनलाइन बिंगो चक्रीसाठी लागणारे साहित्य सह ४०८७० रू मुद्देमाल पोलिसानी जप्त करून संभाजीनगर पोलीस ठाण्यात गु र न१२९/२४ कलम १२ अ म जू का प्रमाणे गुन्हा दाखल केला.ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुतळे,पो.ठोबरे, पो. दुबाले, पो.जोगदंड, पो. घोडके,पो. सानप, पो.कांबळे,पो.जायभाय,पो. वडमारे व स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!