प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर

प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर


 मराठी साहित्यिक व विचारवंत फुले शाहू-आंबेडकर चळवळीचे मार्गदर्शक प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर झाला झाला असून १५ ऑगस्ट २०२४ रोजी वेळ सकाळी ११ वाजता हा पुरस्कार राणीत्री बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने डॉ. भालचंद्र ब्लड बँक सभागृह लातूर या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे.

      प्राचार्य डॉ कमलाकर कांबळे  यांचे "आठवणीचे पक्षी: एक चिकित्सक अभ्यास", "दलित साहित्य शोध, आणि स्वरुप", "महाउम्मग जातक कादंबरी वाड्मयाचे आद्य स्वरुप", "बुध्दाच्या जातक कथा एक अभ्यास" इत्यादी ग्रंथ प्रकाशित झाले असून त्यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यांचे विशेष सन्मान करण्यात आले आहेत.

       त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन त्यांना राणीत्री बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने 'विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी सामाजिक, शैक्षणिक, विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे अवाहन राणीत्री बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव सायास आचार्य यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !