राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात हर घर तिरंगा व आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मोफत रक्त तपासणी शिबीर
राष्ट्रीय सेवा योजनेचा उपक्रम
परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)
लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंध संस्था मुंबई शाखा उपजिल्हा रुग्णालय परळी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिन व आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मोफत रक्त तपासणी शिबीराचे आयोजन बुधवारी (ता.१४) करण्यात आले होते. १३५ विद्यार्थिनींची रक्त तपासणी करण्यात आली. तसेच हर घर तिरंगा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले.
७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हर घर तिरंगा अभियान तसेच महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंध संस्था मुंबई व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात रक्ताच्या विविध चाचण्या शिबीर घेण्यात आले. रक्त तपासणी शिबीराचे उद्घाटन संस्थेचे कोषाध्यक्ष प्रा प्रसाद देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे एचआयव्ही एड्सचे समुपदेशक शरद चव्हाण, प्राचार्या डॉ विद्या देशपांडे, संचालिका छाया पत्की, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा डॉ विनोद जगतकर, प्रा डॉ राजर्षी कल्याणकर, प्रा डॉ प्रविण दिग्रसकर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य एड्स प्रतिबंध संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थिनींसाठी एड्स जनजागृती पोष्टर प्रदर्शन लावण्यात आले होते.यानंतर विद्यार्थिनींसाठी मोफत रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या रक्त चाचण्या मध्ये हेपटीटाइटिस, सीबीसी, आरबीसी, हिमोग्लोबिन आदि रक्त तपासण्या शरद चव्हाण, अमोल गालफडे, अविनाश व्हावळे आदिंनी केल्या. १३५ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्राचार्य डॉ विद्या देशपांडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा प्रविण फुटके यांनी मानले. कार्यक्रमास प्रा डॉ रंजना शहाणे,प्रा प्रविण नव्हाडे, प्रा विशाल पौळ सह विद्यार्थी, शिक्षक,प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा