परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

शिवीगाळ व धक्काबुक्की: तुला उचलून घेऊन जातो म्हणत शेजारणीला धमकी;गुन्हा दाखल

 शिवीगाळ व धक्काबुक्की: तुला उचलून घेऊन जातो म्हणत शेजारणीला धमकी;गुन्हा दाखल 


परळी वैजनाथ  प्रतिनिधी...        

   घराशेजारी राहणाऱ्या एका 35 वर्षीय युवकाने एका महिलेला  शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. त्याचप्रमाणे वाईट हेतूने फिर्यादी महिलेचा हात धरून तुला उचलून घेऊन जातो असे म्हणून धमकी दिल्या प्रकरणी एका जणाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी चाळीस वर्षीय महिला रा.सटवाईचा मळा परळी वै.या आरोपी सचिन वैद्यनाथ नाईकवाडे वय 35 वर्षे रा.सटवाईचा मळा ता. परळी वै. याच्या शेजारीच राहतात.दि. 16 ऑगस्ट रोजी रात्री 11.43 वा. आरोपी फिर्यादी महिलेस बोलू लागला. तेंव्हा मला बोलू नको असे महिला म्हणली असता त्याने शिवागाळ केली. अंगावर येवुन वाईट भावनेने हात धरला व फिर्यादीला लज्जा वाटेल असे कृत्य केले. तसेच फिर्यादीचे मुलास शिवीगाळ करून धक्काबुक्की केली व फिर्यादीस उचलुन घेवुन जातो असे म्हणत धमकी दिली म्हणुन आरोपीविरुद्ध गु.र.न. 130/2024 कलम 74, 75, 115(2),352,351 (2) (3) भा.न्या. स. प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोह चट्टे हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!