दुःखद वार्ता : भावपुर्ण श्रध्दांजली
पत्रकार संजय खाकरे यांना भगिनीशोक: सौ. वैशाली रामेश्वरअप्पा महाजन यांचे निधन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
येथील पत्रकार संजय खाकरे यांच्या भगिनी सोनपेठ येथील रहिवासी सौ. वैशाली रामेश्वरअप्पा महाजन यांचे आज दिनांक 16 रोजी अल्पश: आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या 54 वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुन असा परिवार आहे.
सौ.वैशालीताई रामेश्वरआप्पा महाजन यांच्यावर लातूर येथे उपचार सुरु होते.उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.सोनपेठ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने महाजन व खाकरे कुटुंबावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली
उत्तर द्याहटवा