श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
गेवराई: भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून स्थानिक समन्वय समिती चे अध्यक्ष श्री प्रमोद कुलकर्णी प्रमुख उपस्थिती म्हणून जयमंगल दादा जाधव,प्रमुख अतिथी म्हणून गेवराई शहरातील सर्व स्थापत्य अभियंता वर्ग सर्व श्री.संजय पंडित,सयाजी काळे,रामानंद स्वामी,निलेश खेत्रे,अक्षय शेटे,अक्षय करांडे, ह.भ.प.कैलास महाराज, स्थानिक समन्वय समिती उपाध्यक्ष डॉ.श्री.राधेश्याम झंवर,कार्यवाह श्री दत्ताजी पत्की,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष श्री.अक्षय कुलकर्णी,श्री.नितीन डोळे श्री.अनिल बोर्डे श्री किशोर बोर्डे, डॉ.विजय सिकची श्री.सुदर्शन गुळजकर श्री.बाबासाहेब सांगुळे श्री.केशव पंडित,श्रीम.प्रणिता ताई हिटनाळीकर, प्राथमिक मुख्याध्यापक श्रीम.सुषमा ताई मोरगांवकर माध्यमिक मुख्याध्यापक श्री.अमोल गोरकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले व प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम जयमंगल दादा जाधव यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाचे पद्य गायन श्री गोले सर यांनी केले तर प्रास्ताविक श्रीम.माने ताई यांनी केले.
प्रमुख अतिथी श्री संजय पंडित यांनी शालेय वातावरण व शालेय शिस्त याबाबत समाधान व्यक्त केले व विद्यार्थांच्या उज्वल भवितव्या साठी ही संस्था नेहमीच अग्रेसर असल्याचे सांगत मी देखील या संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचे अभिमानाने सांगितले प्रमुख उपस्थिती जयमंगलदादा जाधव यांनी विद्यार्थ्यांनी योग, प्राणायाम,ध्यानधारणा यांच्या नियोजनातून स्वतःचा विकास करून घ्यावा असे प्रतिपादन केले. स्थानिक समन्वय समिती कार्यवाह दत्ताजी पत्की यांनी स्व विकास साधण्यासाठी व भारतमातेच्या विकासासाठी विद्यार्थी प्रयत्नशील असावे सांगितले अध्यक्षीय समारोप करत असतांना श्री.प्रमोद कुलकर्णी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व योग प्राणायाम ध्यान धारणा या बरोबर पर्यावरचे संगोपन करण्यासाठी चे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीम.रामदासी ताई यांनी केले तर श्रीम.वक्ते ताई यांनी सांगितलेल्या समरसता मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा