इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

समाजाच्या सुखदुःखात कायम पाठीशी राहणारं महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व सावंत सर - अमित घाडगे

 कर्तव्याच्या भावनेने ना.तानाजीराव सावंत यांच्या वतीने १२ कुटुंबाना प्रत्येकी २ लाखाचे आर्थिक सहकार्य

समाजाच्या सुखदुःखात कायम पाठीशी राहणारं महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व सावंत सर - अमित घाडगे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)


 मराठा आराक्षणासाठी आत्महत्या केलेल्या १२ कुटुंबाला महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मराठा भूषण तानाजीराव सावंत यांच्या वतीने प्रत्येकी दोन लाखाचे सहकार्य. परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित भैया घाडगे यांच्या हस्ते चेक सुपूर्द करण्यात आले.


 कसल्याही प्रकारचा गाजावाजा न करता कर्तव्याच्या भावनेने मराठा भूषण ना.तानाजीराव सावंत सर यांच्या वतीने  आजतागायात मराठा समाजाच्या जवळ पास ९० ते १०० कुटुंबांना आर्थिक सहकार्य करत अनेक मुलांना दत्तक घेऊन त्यांच पालकत्व स्वीकारण्यात आलेले आहे. रविवार दिनांक ११ ऑगष्ट २०२४ रोजी परळी वैजनाथ येथे श्रद्धा मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना परळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित भैय्या घाडगे यांच्या हस्ते चेक सुपूर्द करण्यात आले.

           यामध्ये चंद्रकांत लक्ष्मण चाळक किनगाव ता. गेवराई, चंद्रकांत अजबराव पतंगे कांडली ता. कळमनुरी, विजय बाबुराव शिरसाट वाकडी ता. भोकरदन, दिगंबर पंढरीनाथ चव्हाण खवणे पिंपरी ता. सेलू,  प्रमोद जानकीराम भुजबळ धानोरा ता. लोहा, गणेश पांडुरंग कापसे आपेगाव ता. पैठण, भागवत साहेबराव चव्हाण आहेर वाहेगाव ता. गेवराई, स्वानंद हनुमान मस्के पालवण बीड, भरत राम इंदुरे दगडी शहाजनपुर बीड, दत्ता कालिदास महिपाल शिंदेवाडी ता. माजलगाव या आत्महत्याग्रस्त पीडित कुटुंबास सहकार्य करण्यात आले. याप्रसंगी बोलताना अमित भैय्या घाडगे हे म्हणाले की मराठा समाजाच्या सुखा दुःखात कायम पाठीशी राहणार महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व म्हणजे ना.तानाजीराव सावंत सर आहेत.

प्रत्येक कुटुंब हे माझं कुटुंब म्हणून अडचणीला धावणाऱ्या या नेतृत्वास माझा सलाम असल्याच घाडगे म्हणाले. 

 यावेळी सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव, शिवराज जोगदंड, जगदीश काका फरताडे, अर्जुन काळे, राहुल सुरवसे, अनिल सोळंके, अरुण सपाटे, भागवत साबळे, प्रणित काळे, अक्षय सोनवणे, बबलू मोरे, सुनील काका सोळंके, शिवादास चौधरी, बालाजी भाले, धनंजय कराळे यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या