23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे

इमेज
  23 सप्टेंबर 2024 रोजी बांधकाम कामगारांचा कामगार मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या सांगली येथील कार्यालयावर मोर्चा - प्रा.बी. जी.खाडे परळी वैजनाथ.....           बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशन (सिटू)च्या वतीने 23 सप्टेंबर रोजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती बीड जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष  प्रा.बी.जी. खाडे यांनी दिली आहे.              महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील बांधकाम कामगार संघटनांनी 12 ऑगस्ट रोजी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून मागण्यांची निवेदन दिली होती. अधिकाऱ्यांनी सरकारच्या अखत्यारीतील मागण्या सरकारला कळवल्या होत्या. आतापर्यंतही बांधकाम कामगारांच्या या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम फेडरेशनने बांधकाम कामगारांच्या मागण्यांसाठी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या सांगलीतील कार्यालयावर 23 सप्टेंबर 2024 रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चात नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई आदी जिल्ह्

भेल संकुलातील एकूण 11 विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश

 भेल संकुलातील एकूण 11 विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत घवघवीत यश


 परळी (प्रतिनिधी):

                       येथील भा.शि. प्र.सं. अंबाजोगाई संचलित  भेल संकुलातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात्मक विकासाबरोबरच त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सर्व शिक्षकांसोबत क्रीडा शिक्षक ही खूप महत्त्वाचे कार्य करत असतात, याचेच एक मूर्तीमंत उदाहरण म्हणजे नुकत्याच क्रीडा व युवक संचालनालय पुणे यांच्याद्वारे बीड जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मार्फत न्यू दिल्ली पब्लिक स्कूल, परळी येथे झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत वेगवेगळ्या गटात भेल संकुलातील एकूण 11 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड होणे  हा एक आणखीन मानाचा तुरा भेलच्या शिरपेच्यात रोवला गेला.

  यामध्ये 

विभाग1- वयोगट 14 वर्षे (मुले)   चि.शिवम परमेश्वर गुट्टे याने परळी तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला.तर *जिल्हास्तरीय निवड झालेले स्पर्धक* यामध्ये-


चि.ऋषिकेश श्याम शिंदे


 विभाग दोन वयोगट 14 वर्षे (मुली) 


कु. सानवी पंकज अवचार 


विभाग तीन वयोगट 17 वर्ष (मुले) 

चि. सच्चिदानंद चाटे,

 चि दिग्विजय शंकर महाजन


  विभाग चार वयोगट 17 वर्ष (मुली)  कु.अदिती अमोल कुलकर्णी 

कु.वीरश्री शशीशेखर चौधरी 


 विभाग पाच वयोगट 19 वर्षे (मुले)

 

चि. यश आशिष अग्निहोत्री

चि. शर्विल संदीप कुंदे 

चि. अजय हनुमान शिंदे 

विभाग सहा वयोगट 19 वर्षे (मुली)


 कु.दिव्या बालासाहेब गायकवाड इ. 

  

  वरील सर्व एकूण 11 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड होणे म्हणजेच भेलच्या इतिहासातील एक उल्लेखनीय पर्वाची सुरुवातच होय. या सर्व विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करून आपले अमूल्य असे मार्गदर्शन भेल संकुलाचे क्रीडा प्रमुख श्री. यशवंत कांबळे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना केले तसेच श्री. लक्ष्मण राडकर सर,  डॉ. जगदीश कावरे सर, श्री. राजेभाऊ गडदे सर यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांस लाभले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल परळी येथील क्रीडा क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी व पालकांकडूनही क्रीडा शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे .

      तसेच या सर्व विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल जुगलकिशोर लोहिया (अध्यक्ष, स्थानिक समन्वय समिती) श्री. जीवनराव गडगूळ (कार्यवाह) श्री. अमोल दुबे (अध्यक्ष, शालेय समिती), सौ. शोभा भंडारी मॅडम (सदस्य) श्री. राजेश्वर देशमुख (सदस्य) इ.नी आणि संकुलाचे मुख्याध्यापक श्री. गिरीशजी ठाकूर सर, सर्व विभागप्रमुख व शिक्षक वृंदाकडूनही अभिनंदनाचा वर्षाव क्रीडा शिक्षक व विद्यार्थ्यांवर होत आहे. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांना प्रोत्साहित केले गेले अशी माहिती भेल संकुलाचे प्रसिद्ध प्रमुख श्री. प्रफुल्ल कांबळे सर यांनी प्रसिद्धी माध्यमास दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?