सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.रमाकांत महारूद्रअप्पा बुरांडे यांच्या वतीने महाप्रसाद
अखंड शिवनाम कीर्तन आणि श्रावणमास तपोनुष्ठान :तपोनुष्ठानद्वारे सर्वांना आध्यात्मिक शांती आणि समृद्धी लाभते-शि.भ.प. विश्वनाथ स्वामी
परळी वैजनाथ/प्रतिनिधी
शि.भ.प. विश्वनाथ स्वामी वडवळकर यांचे अखंड शिवनाम कीर्तन रविवार दिनांक 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी अत्यंत उत्साहात पार पडले. याच अनुषंगाने ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या श्रावणमास तपोनुष्ठानाचा कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने सुरू आहे.या तपोनुष्ठानाच्या अंतर्गत पंचम ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री शनि मंदिरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वीरशैव लिंगायत समाज आणि श्रावणमास तपोनुष्ठान समिती परळीच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे.
शि.भ.प. विश्वनाथ स्वामी वडवळकर महाराजांनी या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल सांगितले, “आम्ही या पवित्र श्रावणमासात भक्तिपंथाने पुढे जाण्याचा आणि धार्मिक कार्यात अधिक रुचि वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. भाविक भक्तांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम अधिक उजळला आहे. आशा आहे की, ह्या तपोनुष्ठानाद्वारे सर्वांना अध्यात्मिक शांती आणि समृद्धी लाभेल.”या धार्मिक कार्यक्रमात दररोज शिवपाठ, परमरहस्य ग्रंथाचे पारायण, गाथ्यावरील भजन, शिव कीर्तन, शिवजागर आणि नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच, प्रसाद वितरणाचे आयोजन सुसंगतपणे करण्यात आले आहे. भाविक भक्तांचा या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद मिळत असून त्यांची सहभागिता अत्यंत उत्साही आहे.
सोमवार दि.12 अॉगस्ट रोजी गुरूवर्यांचे पुजन,आरती व महाप्रसादाचे आयोजन सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.रमाकांत महारूद्रअप्पा बुरांडे यांच्या वतीने करण्यात आले.
ष.ब्र.108 श्री गुरूपादेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या द्वादश श्रावणमास तपोनुष्ठानाकरिता
श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे अध्यक्ष चेतन सौंदळे,कार्यअध्यक्ष चंद्रकांत उदगीरकर व सर्व पदाधिकारी,सदस्य, वीरशैव लिंगायत समाज तसेच श्रावणमास तपोनुष्ठान समितीच्यावतीने परीश्रम घेण्यात येत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा