गावातून पहिली पीएसआय: लिंबोटा येथील कन्या पोलीस उपनिरीक्षक : निवडीबद्दल सत्कार
गावातून पहिली पीएसआय: लिंबोटा येथील कन्या झाली पोलीस उपनिरीक्षक : निवडीबद्दल सत्कार
परळी वैजनाथ दि १७ (प्रतिनिधी) :-
लिंबोटा गावची सुकन्या कु. राणी दत्तू कराड हिने पीएसआय होण्याचा गावात पहिला मान मीळवला. एम.पी.एस.सी परीक्षेत मार्फत व्ही जे एन टी मध्ये महाराष्ट्रात पहिली आली. नुकत्याच झालेल्या एम.पी.एस.सी परीक्षेत ती राज्यातून एमपीएससी परीक्षेतून पहीली आली. वडील शेतकरी आई घरकाम आणि मजुरी करते (एवढ्या कठीण परस्थीतीत तीने स्वःताच्या बळावर व आई वडीलांचा जिद्दीने शिकत राहीली. लिंबोट्यात तेव्हा आठवी ते दहावी पर्यन्त ची शाळा पांगरीला वश श्री संत भगवान बाबा विद्यालयात शिकली आणि ११ वि व १२ पर्यंत शिक्षण तिचे फुलचंद भाऊ कराड यांनी महाविद्यालय आणल व मुलीचा शिक्षणाची सोय केली. राणीच शिक्षण भगवान बाबा शिक्षण प्रसारक मंडळ येथे झाले. पुढे तीने एम पी एस सी चा आभ्यास पुण्याला केला. आई वडील कमी पैसे देत होते तरी ती खचली नाही. लिंबोट्या सारखा छोट्या गावातून ती आज पीएसआय झाली. ही ही बाब गावच्या नागरिकांना खुप आभीमानाची गोष्ट आहे. आज श्री संत भगवान बाबा शाळेत संस्थाचालक फुलचंद कराड यांच्या शुभहस्ते तीचा सत्कार झाला. यावेळी तिच्या यशा बाबत उपस्थित पालक व गावकऱ्यांना अक्षरशा भावणा आवरता आल्या नाहीत. व ती म्हणाली मी आई वडीलांचे गुरुजनाचे नाव कधीच जाऊ देणार नाही. वेळ पडेल तेव्हा माझ्या गावच्या मुला मुलींना येऊन मार्गदर्शन करेन. माझ्य गावचा स्वाभीमान कायम जपेल. राणी हि फुलचंद कराड यांची नात्याने भाच्ची आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा