श्री. चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात अखंड भारत दिन उत्साहात साजरा
श्री. चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात अखंड भारत दिन उत्साहात साजरा
गेवराई: भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित श्री चिंतेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून स्थानिक समन्वय समिती चे अध्यक्ष श्री प्रमोद कुलकर्णी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री दिलीप बाबा घोगे,भा.शि.प्र.संस्था कार्यवाह डॉ.श्री.हेमंत वैद्य, डॉ.श्री.राधेश्याम झंवर,श्री.अनिल बोर्डे श्रीम.प्रणिता ताई हिटनाळीकर, प्राथमिक मुख्याध्यापक श्रीम.सुषमा ताई मोरगांवकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले व हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत आजचा द्वितीय दिनाचा प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम दिलीप बाबा घोगे यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाचे पद्य गायन इयत्ता आठवी तील विद्यार्थिनीनी केले तर प्रास्ताविक श्रीम.वक्ते ताई यांनी केले तर अखंड भारत दिनाची माहिती श्री.घोलप सर यांनी विद्यार्थ्यांसमोर सविस्तर मांडली.
प्रमुख अतिथी दिलीप बाबा घोगे यांनी एकसंघ राहाणे काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन संगठीत राहण्याचा मंत्र विद्यार्थांना दिला अध्यक्षीय समारोप करत असतांना श्री.प्रमोद कुलकर्णी यांनी आपल्या भारतमातेच्या रक्षणार्थ सदैव आपण कटिबध्द राहण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीम.माने ताई यांनी केले तर श्रीम.वक्ते ताई यांनी सांगितलेल्या समरसता मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा