पोस्ट्स

आयोजन.....

इमेज
  7 ऑक्टोबर रोजी अंबाजोगाई येथे असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद! --------------------------------------------- अंबाजोगाई (प्रतिनिधी) : शेतकरी, कामगार, कष्टकरी दीन-दलित सर्वहारा वर्गाच्या न्यायासाठी जीवन वेचणारे झुंजार स्वातंत्र सेनानी, बीड जिल्ह्याचे माजी खासदार, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने अंबाजोगाई येथे ज्येष्ठ विधितज्ञ एड. असीम सरोदे यांच्याशी संविधान संवाद आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ पत्रकार, संविधान कीर्तनकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर त्यांच्याशी 'संविधानाची पायमल्ली होत आहे का?' याविषयावर संवाद साधणार आहेत. काॅ. गंगाधरअप्पा बुरांडे प्रतिष्ठानच्या वतीने 7 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता अद्यकवी मुकुंदराज सभागृहात या संविधान संवादाचे आयोजन केले आहे. बदलत्या राजकीय, सामाजिक परिस्थितीत संविधानाची गळचेपी होत असल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत समाजमन भक्कम करण्यासाठी एड. असीम सरोदे सातात्याने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधणारे ह.भ.प. शामसुंदर मह

MB NEWS-पीकपाणी वार्तापत्र/महादेव शिंदे: येत्या दोन दिवसांत पाऊस आला नाही तर पीकं वाया जाण्याचा धोका

इमेज
  पीकपाणी वार्तापत्र: येत्या दोन दिवसांत पाऊस आला नाही तर पीकं वाया जाण्याचा धोका परळी वैजनाथ/महादेव शिंदे...........          तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने कापूस, सोयाबीन पिकासह इतर पीके सुकण्यास सुरुवात झाली असून एकदोन दिवसात पाऊस नाही पडला तर पिकांची वाढ खुंटणार असून पीके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.        तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ७८ हजार हेक्टर असून यातील लागवडी योग्य क्षेत्रफळ ६८ हजार हेक्टर आहे. खरीपाची पेरणी साधारणपणे ५८ हजार हेक्टर ते ६० हजार हेक्टर झाली आहे. यामध्ये अंदाजे ८ हजार ४०० हेक्टर वर ऊसाची लागवड आहे. तर यंदा सोयाबीन पीकास जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली असून गेल्यावर्षी सोयाबीन २६ हजार हेक्टरवर पेरण्यात आले होते तर यंदा ३२ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. कारण कापूस पीकासाठी लागवड, खत घालणे, तण काढणे, कापूस वेचणी यासाठी मजूरांची संख्या जास्त लागते यासाठी खर्चही मोठा होतो. म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांचा ओढा यंदा सोयाबीन पीकाकडे वाढला आहे. गेल्यावर्षी कापूस पीकाची लागवड १९ हजार हे

MB NEWS-पत्रकार बालाप्रसाद व्यास यांना मातृशोक

इमेज
  पत्रकार बालाप्रसाद व्यास यांना मातृशोक                                           सौ. पार्वतीबाई हनुमानदासजी व्यास यांचे निधन                                           परळी (प्रतिनिधी) - शहरातील सुभाष चौक येथील रहिवासी सौ. पार्वतीबाई हनुमानदासजी व्यास यांचे वृद्धपकाळाने दि. 10 ऑगस्ट रोजी रात्री निधन झाले.मृत्यूसमयी त्या 70  वर्षाच्या होत्या.   हनुमानदासजी व्यास यांच्या त्या पत्नी व  पत्रकार बालाप्रसाद व्यास यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या पार्थिवदेहावर बुधवार दि. 11 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अंत्ययात्रा सुभाष चौक येथून निघणार आहे.                  त्यांच्या पश्चात पती, 1 मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

MB NEWS-नागापुर वाण धरणावर जि.प. गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन

इमेज
  नागापुर वाण धरणावर जि.प. गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन परळी (दि. 10) - : परळी शहराची तहान भागवणारे नागापूर येथील वाण धरण 100% क्षमतेने भरले असून, येथील नवजलाचे जिल्हा परिषदेतील गटनेते श्री अजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी विधिवत जलपूजन करण्यात आले.  परळी शहराच्या पिण्याच्या पाण्यासह क्षेत्रातील शेती सिंचनासाठी वाण धरणाचे पाणी संबंध परळी तालुक्यात महत्वाचे मानले जाते. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे जलसंपदा विभागामार्फत या जलायशयातील गाळ काढून याची उंची वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, शासकीय स्तरावर याबाबतची प्रक्रिया सुरू आहे.  दरम्यान या जलपूजन समारंभास श्री. अजय मुंडे यांच्यासह शिवाजी सिरसाट, जि. प. सदस्य, प्रा. मधुकर आघाव, पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. गोविंदराव फड, कृ.उ.बा.स संचालक माऊली (तात्या) गडदे, मोहन (दादा) सोळंके, परळी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा सभापती सौ. उर्मिलाताई गोविंदराव मुंडे, संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ चाचा पौळ, गोविंदराव मुंडे यां

MB NEWS- *राजस्थानी गणेश मंडळ कार्यकारणीची निवड : अध्यक्षपदी सचिन झंवर तर सचिवपदी राहुल भंडारी*

इमेज
 *राजस्थानी गणेश मंडळ  कार्यकारणीची निवड : अध्यक्षपदी सचिन झंवर तर सचिवपदी राहुल भंडारी*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....       शहरातील प्रसिद्ध व उपक्रमशील गणेश मंडळांपैकी एक असलेल्या राजस्थानी गणेश मंडळांच्या सन २०२१ च्या नुतन कार्यकारिणी ची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.यामध्ये अध्यक्षपदी सचिन झंवर तर सचिवपदी राहुल भंडारी यांची निवड झाली.           नविन पदाधिकारी नियुक्ती व गणेश उत्सवासंबंधी विविध मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यासाठी दि.०४/०८/२०२१ रोजी श्री. बालाजी मंदिरात बैठक घेण्यात आली. उपस्थित सर्व समाज बांधवांशी आणि पूर्व राजस्थानी गणेश मंडळ 2020 चे अध्यक्ष व सचिव आणि सर्व पदाधिकारी मंडळींशी चर्चा व विचार विमर्श करून उपस्थित युवा गटातून इच्छास्वरूप यंदाच्या गणेश उत्सवासाठी राजस्थानी गणेश मंडळ 2021 च्या अध्यक्ष पदी श्री.सचिन सत्यनारायणजी झंवर आणि सचिव पदी श्री.राहुल संजयकुमारजी भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली. गणेश उत्सव शासनाच्या सर्व नियमांची पूर्तता करत आणि साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. ‘श्रीं’ ची स्थापना,दररोजची पुजा  आणि विविध समाजोपयोगी  उपक्रम याविषयी शासकीय निय

MB NEWS-कोरोनाच्या संकटामुळे समारंभपूर्वक वाढदिवस साजरा न करण्याचा बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा निर्णय*

इमेज
 *कोरोनाच्या संकटामुळे समारंभपूर्वक वाढदिवस साजरा न करण्याचा बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा निर्णय* 🕳️ _सर्वांचे प्रेम सदैव माझ्या साठी उर्जादायी; अनाठायी खर्च टाळण्याचे आवाहन_  परळी वैजनाथ, प्रतिनिधी ---- :            बीड जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे.अनेक जीवाभावाचे लोक जग सोडून गेले आहेत.या भिषण व भयावह परिस्थितीत संवेदना ठेवत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या ११ ऑगस्ट रोजी असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. सर्वांचे प्रेम सदैव माझ्यासाठी उर्जादायी असुन वाढदिवसा वरील उत्सवी स्वरुपातील अनाठायी खर्च टाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.       कोरोनामुळे सर्वत्र परिस्थिती गंभीर असून परळी शहर देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या परिणामांना सामोरे जात आहे.अनेकजण जीवाभावाचे लोक जग सोडून गेले आहेत. या परिस्थितीत समारंभ पुर्वक वाढदिवस करणे मनस्वी टाळावे वाटते. सर्वांच्या शुभेच्छा - आशीर्वाद मला लढण्याचे बळ देतात, परंतु कोरोनाशी व या भयावह परिस्थितीशी लढण्याचे मोठे आव्

MB NEWS-परळीत देऊळबंद परिस्थितीत पायरी व कळस दर्शनाने श्रावणी पहिल्या सोमवारी भाविकांची श्रद्धा ओसंडली ! 🕳️ *वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक पद्धतीने मनमोहक श्रंगारपुजा(video)

इमेज
  परळीत देऊळबंद परिस्थिती - पायरी व कळस दर्शनाने श्रावणी पहिल्या सोमवारी भाविकांची श्रद्धा ओसंडली ! 🕳️ *वैद्यनाथ प्रभुंची पारंपरिक पद्धतीने मनमोहक श्रंगारपुजा परळी वैजनाथ, प्रतिनिधी ..          देऊळबंद परिस्थितीतही पायरी व कळस दर्शनाने परळीत भाविकांची श्रद्धा ओसंडली असल्याचे पहावयास मिळाले.पवित्र श्रावणमास पर्वकाळात दरवर्षी बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ प्रभुंच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.परंतु कोरोनाविषयक निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षांपासून दर्शनबंदी आहे.त्यामुळे भाविक पायरीवरच दर्शन घेत आहेत.आज श्रावणी पहिल्या सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.                 श्रावणमास पर्वकाळात वैद्यनाथ मंदिर परिसर भाविकांच्या उपस्थितीने फुलून जातो. वैद्यनाथ मंदिर,संत जगमित्रनागा मंदिर आदींसह शहरातील मंदिरात दर्शनासाठी परळीत पंचक्रोशीतील हजारो भाविक येतात.पण सध्या या देउळबंद अवस्थेत मंदिरांची दारं बंद असल्याने भाविकांची श्रद्धा पायरीला दर्शन घेऊन वाहिली जात आहे.आज वैद्यनाथ मंदिर परिसरात हे चित्र बघायला मिळाले. या देऊळ बंद ने अनेक समस्या उभ्

MB NEWS-सकल मराठा समाजाच्या मागणीला यश;पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यान जागा निश्चित* *मराठा भवनसाठी जागा देण्याचे ना.धनंजय मुंडे यांच्याकडून नगर परिषदेस आदेश*

इमेज
 * सकल मराठा समाजाच्या मागणीला यश;पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यान जागा निश्चित*  *मराठा भवनसाठी जागा देण्याचे ना.धनंजय मुंडे यांच्याकडून नगर परिषदेस आदेश* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) शुक्रवार दि 8 ऑगस्ट रोजी "मराठा भवन" साठी जागे संदर्भात राष्ट्रमाता जिजामाता उद्यान येथे बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत "मराठा भवन" साठी च्या जागे संदर्भात समाजाच्या मागणीची दखल घेऊन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी लागलीच जागा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेला आदेशित करत, लवकरच "मराठा भवन" साठी इंडस्ट्रियल इरयातील जागा ताब्यात देण्यात येईल असे समाजाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. समाजाच्या "मराठा भवन" जागेसाठीचा खूप महत्वाचा प्रश्न मार्गी लागला. शहराच्या मध्यवर्ती जागा हवी या मागणी लक्षात घेता पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यान ही जागा लवकरच मराठा समाजाच्या ताब्यात देऊन त्या ठिकाणी भव्य असे "मराठा भवन" स्थापन होऊन समाजातील बऱ्याच गोष्टीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मराठा एकजुटीचा विजय झाला असून यापुढेही प्रत्येक विषयात मराठा समाजाने गट - त

MB NEWS-माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दि.११ रोजी रक्तदान शिबिर* 🕳️ _मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन_

इमेज
 * माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दि.११ रोजी रक्तदान शिबिर* 🕳️ _मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन_ परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......       परळी शहरातील कर्तृत्ववान युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर राबविण्यात येणार आहे.           बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्र मंडळ, परळी वै. बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 पासून स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे "रक्तदान शिबीर" आयोजित करण्यात आले आहे.दरवर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. गेल्या 10 वर्षांपासुन सातत्याने घेण्यात येणारा हा सामाजिक उपक्रम ठरला आहे.दर वर्षी नवनविन रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदानाचे कार्य रूजविणे बाबत जागृती करणारा परळीतील हा

MB NEWS-ना.धनंजय मुंडे व सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बचतगट बळकटीकरण विशेष योजना ! परळीमधील महिला बचतगटांना मिळणार प्रत्येकी १ लाखाचा "पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार स्वयंरोजगार निधी"

इमेज
  ना.धनंजय मुंडे व सौ. राजश्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बचतगट बळकटीकरण विशेष योजना !   परळीमधील महिला बचतगटांना मिळणार प्रत्येकी १ लाखाचा "पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार स्वयंरोजगार निधी" परळी वैजनाथ, प्रतिनिधी......          राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि नगर परिषद गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष प्रयत्नातून परळीमधील सर्व बचतगटांना "पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार स्वयंरोजगार निधी" योजना सुरू करण्यात येणार आहे.या अंतर्गत प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचे वार्षिक 4% व्याजदराने पतपुरवठा करण्यात येणार आहे.         नाथ प्रतिष्ठान यांच्यावतीने सदर योजना राबविण्यात येणार आहे.स्वयंसहाय्यता बचतगटांचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने ही योजना निर्माण केली असून याचा सर्व बचतगटांना लाभ मिळणार आहे.याबाबत महिला बचतगटांच्या महिलांची बैठक घेण्यात आली.यावेळीउपस्थित सर्व महिलांना सौ.राजश्री धनंजय मुंडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा संबोधित केले व मार्गदर्शन केले.या कार्यक्रम

MB NEWS-परळीत चोरट्यांना अनलाॅक: चोरट्यांचा थेट एटिएमवरच डल्ला मारण्याचा प्रयत्न; सीसीटीव्ही कॅमेर्याचे नुकसान

इमेज
  परळीत चोरट्यांना अनलाॅक: चोरट्यांचा थेट एटिएमवरच डल्ला मारण्याचा प्रयत्न; सीसीटीव्ही कॅमेर्याचे नुकसान परळी /प्रतिनिधी.....       नाथ चित्रपट मंदिर समोरील एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेरे चे नुकसान झाले आहे.शहरातील नाथ चित्र मंदिर समोरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे या एटीएम चे मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे चे नुकसान करण्यात आले. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून आर्थिक नुकसान नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरची घटना मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचा अंदाज असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे याचा मागोवा घेतला जात आहे. घटनास्थळी परळी शहर पोलिस चे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सपोनि अशोक खरात, पीएसआय मोहन जाधव, भताने, घटमल इतर कर्मचार्‍यांनी धाव घेतली.

MB NEWS-महाराष्ट्र बँकेच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्त परळीत उपोषण*

इमेज
 * महाराष्ट्र बँकेच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्त परळीत उपोषण* परळी वैजनाथ....             येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत गृहकर्ज जाणीवपूर्वक विलंब करुन टाळाटाळ करत फाईल रिजेक्ट केल्याच्या निषेधार्थ उपोषण करण्यात येत असून शाखाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी खातेदार मंजु वंजारे यांनी केली आहे.  यासंदर्भात उपोषणकर्त्या मंजु नारायण वंजारे यांनी सांगितले की, २३ ऑक्टोबर २०२० रोजी आपल्या शाखेत गृहकर्जासाठी अर्ज केलेला होता, तो आज पर्यंत मंजूर करण्यात आला नाही, उलट दहा महिने विलंबानंतर बँकेच्या अधिकृत पॅनल वरील तीन वकिलांनी सकारात्मक अहवाल दिला असताना अँड. विजय केदार यांनी नकारात्मक अहवाल दिल्याचे कारण पुढे केले आहे. यापूर्वी शहरातील वकीलांनी सर्वे नंबर ४६०६ मधील जागा रजिस्टरीसाठी योग्य असल्याचा अहवाल दिलेला आहे. परंतु अँड विजय केदार यांनी जाणीवपूर्वक नकारात्मक अहवाल दिला. त्याला कसलाही ठोस पुरावा नाही. विजय केदार म्हणतात की प्रॉपर्टी हस्तांतर करण्यास योग्य नाही जर असे असेल तर रजिस्टरी कार्यालयाने ही (खरीदी खत) रजिस्ट्री का करून दिली ? जिल्हाधिकाऱ्यांनी एन ए लेआउट करून का दिला ? रजि

MB NEWS- *पंडितराव मुठाळ यांच्या निधनाने ज्येष्ठ कार्यकर्ता गमावला - पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना*

इमेज
 *पंडितराव मुठाळ यांच्या निधनाने ज्येष्ठ कार्यकर्ता गमावला - पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केल्या शोकभावना* परळी दि. ०५ ------  डिग्रस येथील भाजपचे नेते पंडितराव मुठाळ यांच्या निधनाने आम्ही उमदे व्यक्तिमत्त्व आणि ज्येष्ठ कार्यकर्ता गमावला आहे अशा शब्दात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी शोकभावना व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.   मुठाळ यांच्या निधनाची वार्ता समजली, अतीव दुःख झाले. सिरसाळा व परिसरातील शेतकरी, शेतमजूर व सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांविषयी त्यांना जिव्हाळा होता. त्यांच्या निधनाने तालुका एका उमद्या व्यक्तीमत्वाला मुकला आहे, त्यांच्या निधनाने कोसळलेल्या दुःखात मी व माझा परिवार सहभागी आहे, अशा शोकभावना व्यक्त करून पंकजाताई यांनी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. ••••

MB NEWS-सोन्याची दुकान समजुन फोडली दुसरीच दुकाने; सिरसाळा येथे पाच दुकाने फोडण्याचा प्रयत्न

इमेज
  सोन्याची दुकान समजुन फोडली दुसरीच दुकाने; सिरसाळा येथे पाच दुकाने फोडण्याचा प्रयत्न  परळी वैजनाथ, प्रतिनिधी... गावातील मुख्य रस्त्यावरील पाच दुकाने चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी(ता.5)पहाटे उघडकीस आला.याबाबत माहिती अशी की गावातील मुख्य रस्त्यावरील वैद्यनाथ स्टील सेंटर,संध्या कन्फेशनरी,आर्या साडी सेंटर,लहूदास ऍग्रो,व महाराष्ट्र ड्रेसेस या पाच दुकानाचे शटर चोरट्यांनी तोडले. दुकानातील दहा हजार रुपये किमतीचे कपडे,व नगदी तीन हजार रुपये लंपास केल्याचे सांगण्यात आले.या चोरट्यांचा मुख्य उद्देश सोन्याचा दुकान फोडण्याचा होता,परंतु सोन्याचे दुकानचे बॅनर पाहून ही दुकाने फोडण्यात आली आहेत. चोरट्यांनी धनश्री ज्वेलर्स या दुकानाचे सीसीटीव्ही तोडून शटर वाकवून दोन कुलपे तोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.या घटनेने बाजारपेठेत खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले.पोलिसांनी या चोरट्यांचा तपास करण्याची मागणी होत आहे.

MB NEWS-*ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शस्त्रक्रिया शिबीराचा होणार शुभारंभ !* *🕳️आजपासून आरोग्य सेवा सप्ताहातील नेत्र शस्त्रक्रियांना अंबाजोगाई व परळीत सुरुवात*🕳️*

इमेज
  *ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शस्त्रक्रिया शिबीराचा होणार शुभारंभ !* *🕳️आजपासून आरोग्य सेवा सप्ताहातील नेत्र शस्त्रक्रियांना अंबाजोगाई व परळीत सुरुवात*🕳️* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        परळी येथील आरोग्य सेवा सप्ताहात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या नेत्ररोग तपासणी शिबिरात शिफारस करण्यात आलेल्या ५०० रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत असुन आज शुक्रवारपासून (दि.६) आरोग्य सेवासप्ताहातील नेत्र शस्त्रक्रियांना अंबाजोगाई व परळीत सुरुवात होणार आहे.पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शस्त्रक्रिया शिबीराचा शुभारंभ होणार आहे.या शस्त्रक्रियेसाठी २० रुग्णांना परळी येथुन रवाना करण्यात आले.               राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे नेत्ररोग तपासणी शिबिर झाले. या शिबीरात जवळपास २००० रुग्णांनी या शिबीराचा लाभ

MB NEWS-गावभागात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा; नागरीकांनी दिले निवेदन

इमेज
गावभागात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा; नागरीकांनी दिले निवेदन   परळी वैजनाथ ... शहरातील गणेशपार भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी जुन्या गाव भागातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने वीज वितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता यांना भेटून निवेदन दिले.  गेल्या काही दिवसापासून गणेशपार भागातील, सावता माळी मंदिर परिसर, नांदूरवेस गल्ली, जंगम गल्ली, अंबेवेस, भिमनगर, साठे नगर, खंडोबा नगर, किर्ती नगर, कृष्णा नगर, तुळजा नगर, गंगासागर नगर, सिध्देश्वर नगर, खुदबे नगर, देशमुख गल्ली, धोकटे गल्ली, बंगला गल्ली आदी भागातील वीज पुरवठा सतत खंडीत केला जात आहे. दिवस भरात किमान वीस ते पंचवीस वेळा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. तसेच कमी दाबाने वीज पुरवठा होतो. यामुळे घरातील विद्दुत यंञे खराब होत आहेत. हा प्रकार केवळ शहरातील इतर विभागात लोड येत असल्याने गणेशपार भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. याच बरोबर नव्याने बसवण्यात आलेले ट्रान्स्फार्मर सुरू करावेत या मागणीसाठी आज नागरिकांनी उप कार्यकारी अभियंता प्रशांत आंबडकर व अभियंता कटके यांच्याशी चर्चा करण्यात आली व निवेदन देण्

MB NEWS-*एक हात मदतीचा...... पुरग्रस्तांसाठी स्वाभिमानी संघर्ष सेना मदत घेवुन पोहोचली पुरग्रस्त गावात-वैजनाथ गुट्टे*

इमेज
 *एक हात मदतीचा...... पुरग्रस्तांसाठी स्वाभिमानी संघर्ष सेना मदत घेवुन पोहोचली पुरग्रस्त गावात-वैजनाथ गुट्टे* *परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         पुरग्रस्तांसाठी स्वाभिमानी संघर्ष सेना पुढे आली असुन एक हात मदतीचा ही भावना ठेवून स्वाभिमानी संघर्ष सेना मदत घेवुन  पुरग्रस्त गावात पोहोचली आहे.या मदतीबद्दल गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.           22 /07/21 ही तारीख चिपळूणवाशीयांसाठी अतिशय विध्वंसकारी ठरली. ढगफुटी सदृश्य पावसाने दोन तासात होत्याचे नव्हते झाले. आणि उरल्या फक्त  घरांच्या भिंती व अस्थाव्यस्त झालेले जनजीवन. आणि मग सर्व कोकणवाशीय व उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू झाला. प्रत्येक व्यक्तीची आपल्या कडून काहीतरी मदत ही  पूरग्रस्तांना मिळालीच पाहिजे "आपणही खारीचा वाटा उचलला पाहिजे " या भावनेतुन स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य व आम्ही पुणेकर ढोल ताशा पथक यांनी संयुक्त बैठक घेऊन पुरग्रस्त भागात मदत घेवुन जायचे नियोजन केले. कमी कालावधीत लोकांना मदत मिळायला सुरुवात झाली. झालेले नुकसान कधीही भरून येणार नाही पण उभं राहण्याचा आधार ही मदत बनली अशाच भावनेतून &quo

MB NEWS-सुयशवार्ता: कु.ईश्वरी मुरलीधर धर्माधिकारीचे १२ वी परिक्षेत ९७ % गुण मिळवत घवघवीत यश

इमेज
  सुयशवार्ता: कु.ईश्वरी मुरलीधर धर्माधिकारीचे १२ वी परिक्षेत ९७ % गुण मिळवत घवघवीत यश  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) वतीने घेण्यात आलेल्या १२ वी परिक्षेत कु.ईश्वरी मुरलीधर धर्माधिकारी हिने ९७% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.         १२वी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.या परिक्षेत परळी येथील मुरलीधर धर्माधिकारी यांची कन्या कु.ईश्वरी हिने ९७ % गुण मिळविले आहेत. अभ्यासात सातत्य ठेवत ऑनलाइन सारख्या नव्या माध्यमाला आत्मसात करत तीने हे घवघवीत यश मिळवले आहेत.या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

MB NEWS-सुयशवार्ता: कु.साक्षी सायस रणखांबेचे १२ वी परिक्षेत ९४.१६ % गुण मिळवत घवघवीत यश

इमेज
  सुयशवार्ता: कु.साक्षी सायस रणखांबेचे १२ वी परिक्षेत ९४.१६ % गुण मिळवत घवघवीत यश  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) वतीने घेण्यात आलेल्या १२ वी परिक्षेत कु.साक्षी सायस रणखांबे हिने ९४.१६% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.विज्ञान शाखेतून तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.          १२वी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.या परिक्षेत उखळी बु. येथील म.फुले कला व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.साक्षी सायस रणखांबे हिने विज्ञान शाखेत ९४.१६ % गुण मिळविले आहेत.अभ्यासात सातत्य ठेवत ऑनलाइन सारख्या नव्या माध्यमाला आत्मसात करत तीने हे घवघवीत यश मिळवले आहेत.या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल तिचे संस्था सचिव नवनाथ मुजमुले, प्राचार्य व्ही.के.राठोड, प्राध्यापकवृंद, शिक्षक, कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.

MB NEWS-पिकविमा आंदोलकांचा सत्कार

इमेज
  पिकविमा आंदोलकांचा सत्कार सोनपेठ, दि.०३(प्रतिनिधी) : सोनपेठ तालुक्यातील पिकविम्याचे आंदोलन सातत्याने चालू ठेऊन शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देणाऱ्या विश्वंभर गोरवे व आंदोलकांचा सत्कार करण्यात आला.  सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पिकविम्यासाठी २०१७ पासून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचा तालुकभरात सत्कार केला जात आहे. पीक विम्याचा परिपूर्ण अभ्यास करून प्रशासकीय, न्यायालयीन व रस्त्यावरील आंदोलने करUन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा मिळवून देणाऱ्या विश्वमभर गोरवे, शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू, देविदास भुजबळ, माधव घुन्नर, शिवसेना शहरप्रमुख कृष्णा पिंगळे आदींचा सत्कार तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी केला. सोनपेठ, शिरशी, शेळगाव यासह तालुक्यातील अनेक गावांत या आंदोलक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नृसिंहसेठ झंवर, जनार्धन डुकरे, व्यंकटराव बागवाले, पांडुरंग गोरवे, भीमराव बिडवे, उमाकांत बागवाले, ठोंबरे, मुंजा खोसे, धोंडिबा धबडे, हनुमान कुऱ्हाडे, नगरसेवक सुनील बर्वे, मारोती रंजवे, लक्ष्मीकांत देशमुख, पांडुरंग सोळंके, शरद भोसले, बळीराम कांदे आदींची उपस्थिती होती.  सोनपेठ फोटो:

MB NEWS-सुयशवार्ता: चि.लक्ष्मीकांत संतोष जुजगरचे १२ वी परिक्षेत 96% गुण मिळवत घवघवीत यश

इमेज
  सुयशवार्ता: चि.लक्ष्मीकांत संतोष जुजगरचे १२ वी परिक्षेत 96% गुण मिळवत घवघवीत यश  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12 वी परिक्षेत चि.लक्ष्मीकांत संतोष जुजगर याने 96% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.                 12 वी परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.या परिक्षेत परळी येथील संतोष जुजगर यांचे सुपुत्र लक्ष्मीकांत याने 96 % गुण मिळविले आहेत.अतिशय अभ्यासु व शिक्षणात मेहनतीची त्याची लहानपणापासून तयारी दिसुन येते.या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS- 🕳️ *सुयशवार्ता*🕳️ *स्वप्नील सोपान चाटेचे सीबीएससी १० वी परिक्षेत 95 % गुण मिळवत घवघवीत यश*

इमेज
 🕳️ *सुयशवार्ता*🕳️  *स्वप्नील सोपान चाटेचे सीबीएससी १० वी परिक्षेत 95 % गुण मिळवत घवघवीत यश*  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) वतीने घेण्यात आलेल्या १० वी परिक्षेत स्वप्नील सोपान चाटे ने 95 % गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.                सीबीएससी १० वी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.या परिक्षेत परळी येथील सोपान चाटे यांचे सुपुत्र स्वप्नील याने 95 % गुण मिळविले आहेत.अतिशय अभ्यासु व शिक्षणात मेहनतीने अभ्यासात सातत्य ठेवत ऑनलाइन सारख्या नव्या माध्यमाला आत्मसात करत तीने हे घवघवीत यश मिळवले आहेत.या यशाबद्दल  सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS-सुयशवार्ता: चि.कौस्तुभ प्रदीप कुलकर्णीचे १२ वी परिक्षेत 94% गुण मिळवत घवघवीत यश

इमेज
  सुयशवार्ता: चि.कौस्तुभ प्रदीप कुलकर्णीचे  १२ वी परिक्षेत 94% गुण मिळवत घवघवीत यश  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या  वतीने घेण्यात आलेल्या 12 वी परिक्षेत चि.कौस्तुभ प्रदीप कुलकर्णी  याने 94.14% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.                 12 वी परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.या परिक्षेत परळी येथील प्रदीप कुलकर्णी यांचे सुपुत्र कौस्तुभ याने 94.14 % गुण मिळविले आहेत.अतिशय अभ्यासु व शिक्षणात मेहनतीची त्याची लहानपणापासून तयारी दिसुन येते.या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS-सुयशवार्ता: कु.श्रावणी प्रशांत जोशीचे सीबीएससी १० वी परिक्षेत 93.3 % गुण मिळवत घवघवीत यश

इमेज
  सुयशवार्ता: कु.श्रावणी प्रशांत जोशीचे सीबीएससी १० वी परिक्षेत 93.3 % गुण मिळवत घवघवीत यश  परळी वैजनाथ, प्रतिनिधी....        केंद्रीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) वतीने घेण्यात आलेल्या १० वी परिक्षेत कु.श्रावणी प्रशांत जोशी हिने 93.3 % गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.         सीबीएससी १० वी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.या परिक्षेत परळी येथील प्रशांत जोशी यांची सुकन्या कु.श्रावणी जोशी हिने 93.3 % गुण मिळविले आहेत.अतिशय अभ्यासु व शिक्षणात मेहनतीची श्रावणीची लहानपणापासून तयारी दिसुन येते.अभ्यासात सातत्य ठेवत ऑनलाइन सारख्या नव्या माध्यमाला आत्मसात करत तीने हे घवघवीत यश मिळवले आहेत.या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

MB NEWS- *सुयशवार्ता:अथर्व गणेगांवकर यांची स्थापत्य अभियांत्रिकी पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी जगप्रसिद्ध टेक्सास विद्यापीठात निवड*

इमेज
 *सुयशवार्ता:अथर्व गणेगांवकर यांची स्थापत्य अभियांत्रिकी पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी जगप्रसिद्ध टेक्सास विद्यापीठात निवड* परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        जगप्रसिद्ध असलेल्या अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात स्थापत्य अभियांत्रिकी पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी अथर्व शिल्पा प्रविण गणेगांवकर यांची निवड झाली आहे. या उत्तुंग यशस्वी वाटचालीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.          अथर्व गणेगांवकर हे परळीचे माजी गटशिक्षणाधिकारी  अशोकराव भातंब्रेकर व श्रीमती प्रतिमाताई भातंब्रेकर यांचे नातु आहेत.अथर्व यांचे शिक्षण पुणे येथे झालेले आहे.स्थापत्य अभियांत्रिकीच्या शिक्षणशाखेत पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी त्यांची जगप्रसिद्ध टेक्सास विद्यापीठात निवड झाली असुन बांधकाम व्यवस्थापन विषयातील पुढील उच्च शिक्षण व संशोधन ते करणार आहेत. लहानपणा पासुनच अतिशय बुद्धिमान व मेहनती अशी त्यांची ओळख आहे.त्याचप्रमाणे मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवारही आहे. संगीत,वादन या कलेतही त्यांची अभिरुची आहे.सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्त्व अशी त्यांची आप्तेष्ट व मित्रपरिवारात ओळख आहे.उच्च शिक्षणासाठी त्यांची झा

MB NEWS-*◼️बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी 4 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल*

इमेज
------------------------------------------  *◼️बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, दुपारी 4 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल* ------------------------------------------  दहावीचा निकाल  लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात महत्वाची माहिती हाती आली असून उद्या निकाल लागणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.  कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागला आहे. उद्या दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.   राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतला. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले होते. या मूल्यमापनाच्या आधारे उद्या बारावीचा निकाल दुपारी 4 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.