MB NEWS-नागापुर वाण धरणावर जि.प. गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन

 नागापुर वाण धरणावर जि.प. गटनेते अजय मुंडे यांच्या हस्ते जलपूजन


परळी (दि. 10) - : परळी शहराची तहान भागवणारे नागापूर येथील वाण धरण 100% क्षमतेने भरले असून, येथील नवजलाचे जिल्हा परिषदेतील गटनेते श्री अजय मुंडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी सायंकाळी विधिवत जलपूजन करण्यात आले. 

परळी शहराच्या पिण्याच्या पाण्यासह क्षेत्रातील शेती सिंचनासाठी वाण धरणाचे पाणी संबंध परळी तालुक्यात महत्वाचे मानले जाते. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे हे जलसंपदा विभागामार्फत या जलायशयातील गाळ काढून याची उंची वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, शासकीय स्तरावर याबाबतची प्रक्रिया सुरू आहे. 



दरम्यान या जलपूजन समारंभास श्री. अजय मुंडे यांच्यासह शिवाजी सिरसाट, जि. प. सदस्य, प्रा. मधुकर आघाव, पंचायत समितीचे सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. गोविंदराव फड, कृ.उ.बा.स संचालक माऊली (तात्या) गडदे, मोहन (दादा) सोळंके, परळी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा सभापती सौ. उर्मिलाताई गोविंदराव मुंडे, संजय गांधी निराधार समितीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ चाचा पौळ, गोविंदराव मुंडे यांसह आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार