MB NEWS-*एक हात मदतीचा...... पुरग्रस्तांसाठी स्वाभिमानी संघर्ष सेना मदत घेवुन पोहोचली पुरग्रस्त गावात-वैजनाथ गुट्टे*

 *एक हात मदतीचा...... पुरग्रस्तांसाठी स्वाभिमानी संघर्ष सेना मदत घेवुन पोहोचली पुरग्रस्त गावात-वैजनाथ गुट्टे*



*परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

        पुरग्रस्तांसाठी स्वाभिमानी संघर्ष सेना पुढे आली असुन एक हात मदतीचा ही भावना ठेवून स्वाभिमानी संघर्ष सेना मदत घेवुन  पुरग्रस्त गावात पोहोचली आहे.या मदतीबद्दल गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

          22 /07/21 ही तारीख चिपळूणवाशीयांसाठी अतिशय विध्वंसकारी ठरली. ढगफुटी सदृश्य पावसाने दोन तासात होत्याचे नव्हते झाले. आणि उरल्या फक्त  घरांच्या भिंती व अस्थाव्यस्त झालेले जनजीवन. आणि मग सर्व कोकणवाशीय व उर्वरित सर्व महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू झाला. प्रत्येक व्यक्तीची आपल्या कडून काहीतरी मदत ही  पूरग्रस्तांना मिळालीच पाहिजे "आपणही खारीचा वाटा उचलला पाहिजे " या भावनेतुन स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य व आम्ही पुणेकर ढोल ताशा पथक यांनी संयुक्त बैठक घेऊन पुरग्रस्त भागात मदत घेवुन जायचे नियोजन केले. कमी कालावधीत लोकांना मदत मिळायला सुरुवात झाली. झालेले नुकसान कधीही भरून येणार नाही पण उभं राहण्याचा आधार ही मदत बनली अशाच भावनेतून "समाजासाठी आपण ही काहीतरी देणं लागतो" अशी आत्मीयता व तळमळ मनात ठेवून मिळेल त्या माणसांकडून जशी मिळेल अशी मदत घेऊन सामाजिक बांधिलकी जपत स्वाभिमानी संघर्ष सेना व आम्ही पुणेकर ढोल ताशा पथक पुणे, नवेदित वकील हितगुज मंच पुणे मोरया ग्रुप पुणे व संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने कमी कालावधीत भरपुर मदत गोळा केली.  

               दि: ३ ऑगस्ट रोजी मदत घेऊन चिपळुन येथे पूरग्रस्त गावात पोहचले दिवस भर पडणाऱ्या पावसात सर्व टीम अतिशय आपुलकीने साहित्य वाटत होती यावेळी संघटनेचे पदाधिकारी यांनी सदरील पुरग्रस्त भागाची पाहणी केली अनेक कुटुंबांचे संसार उद्धवस्त झाले आहेत अशा वेळी एक खारीचा वाटा म्हणुन स्वाभिमानी संघर्ष सेना जिवनावश्यक वस्तु अन्न धान्य व संसार उपयोगी साहित्य, कपडे, संसार पुन्हा उभा करण्यासाठी लागणारी भांडी ईत्यादी साहित्य घेवुन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी धावुन गेली व पुरग्रस्रतांना साहित्याचे वाटप केले यावेळी स्वाभिमानी संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ सांगळे , प्रदेशाध्यक्ष विजय बडे, युवक प्रदेशाध्यक्ष संतोष भैय्या खंदारे , राज्य सरचिटणीस वैजनाथ गुट्टे, राज्य संघटक अमित शर्मा, कोकण विभाग प्रमुख विनायक पाटेकर, आम्ही पुणेकर ढोल ताशा पथक मंडळचे संचालक संकेत साळवी, कायदेशीर सल्लागार अॅड.एस.एस.आघाव, कायदे आघाडी भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड.सावंत सर , बाळासाहेब खंदारे सर, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा भाग्यश्रीताई पवार, दिघी शहराध्यक्षा उज्वलाताई कुंभार व आदी मान्यवर, युवक व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !