MB NEWS-पीकपाणी वार्तापत्र/महादेव शिंदे: येत्या दोन दिवसांत पाऊस आला नाही तर पीकं वाया जाण्याचा धोका

 पीकपाणी वार्तापत्र: येत्या दोन दिवसांत पाऊस आला नाही तर पीकं वाया जाण्याचा धोका

परळी वैजनाथ/महादेव शिंदे........... 

      तालुक्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने कापूस, सोयाबीन पिकासह इतर पीके सुकण्यास सुरुवात झाली असून एकदोन दिवसात पाऊस नाही पडला तर पिकांची वाढ खुंटणार असून पीके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

       तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ७८ हजार हेक्टर असून यातील लागवडी योग्य क्षेत्रफळ ६८ हजार हेक्टर आहे. खरीपाची पेरणी साधारणपणे ५८ हजार हेक्टर ते ६० हजार हेक्टर झाली आहे. यामध्ये अंदाजे ८ हजार ४०० हेक्टर वर ऊसाची लागवड आहे. तर यंदा सोयाबीन पीकास जास्त भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणावर केली असून गेल्यावर्षी सोयाबीन २६ हजार हेक्टरवर पेरण्यात आले होते तर यंदा ३२ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. कारण कापूस पीकासाठी लागवड, खत घालणे, तण काढणे, कापूस वेचणी यासाठी मजूरांची संख्या जास्त लागते यासाठी खर्चही मोठा होतो. म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांचा ओढा यंदा सोयाबीन पीकाकडे वाढला आहे. गेल्यावर्षी कापूस पीकाची लागवड १९ हजार हेक्टर झाली होती. ती यावर्षी फक्त ९ ते १० हजार हेक्टरच झाली आहे. तूर या पीकाची पेरणी साधारणपणे ५ हजार हेक्टर करण्यात आली आहे.

 गेल्या वर्षी तूर ४ हजार हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती. दरम्यान यंदा जुन महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. पण गेल्या आठवडाभरापासून पावसाने ओढ दिली असून काही ठिकाणी पिके पाण्याअभावी सुकत आहेत. पाऊस न पडल्याने पिकांची वाढ खूंटण्याची शक्यता असून येत्या दोन चार दिवसांत पाऊस नाही पडला तर पिके वाळून जाण्याची शक्यता आहे. तर मुगाला सध्या शेंगा लगडल्या आहेत मात्र भरण्याच्या वेळी पावसाने ओढ दिली आहे. तालुक्यात दोन तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर आभाळ भरुन येत आहे. पण पाऊस काही पडत नाही. शेतकऱ्यांचा नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. उघडीप दिल्याने काही शेतकरी अंतर्गत मशागतीची कामे करत आहेत. ज्यांच्या कडे पाण्याची व्यवस्था आहे. ते शेतकरी ड्रीपच्या साह्याने पाणी देत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार