MB NEWS- *राजस्थानी गणेश मंडळ कार्यकारणीची निवड : अध्यक्षपदी सचिन झंवर तर सचिवपदी राहुल भंडारी*

 *राजस्थानी गणेश मंडळ  कार्यकारणीची निवड : अध्यक्षपदी सचिन झंवर तर सचिवपदी राहुल भंडारी*



 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

      शहरातील प्रसिद्ध व उपक्रमशील गणेश मंडळांपैकी एक असलेल्या राजस्थानी गणेश मंडळांच्या सन २०२१ च्या नुतन कार्यकारिणी ची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे.यामध्ये अध्यक्षपदी सचिन झंवर तर सचिवपदी राहुल भंडारी यांची निवड झाली.

          नविन पदाधिकारी नियुक्ती व गणेश उत्सवासंबंधी विविध मुद्द्यांवर विचार विनिमय करण्यासाठी दि.०४/०८/२०२१ रोजी श्री. बालाजी मंदिरात बैठक घेण्यात आली. उपस्थित सर्व समाज बांधवांशी आणि पूर्व राजस्थानी गणेश मंडळ 2020 चे अध्यक्ष व सचिव आणि सर्व पदाधिकारी मंडळींशी चर्चा व विचार विमर्श करून उपस्थित युवा गटातून इच्छास्वरूप यंदाच्या गणेश उत्सवासाठी राजस्थानी गणेश मंडळ 2021 च्या अध्यक्ष पदी श्री.सचिन सत्यनारायणजी झंवर आणि सचिव पदी श्री.राहुल संजयकुमारजी भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली. गणेश उत्सव शासनाच्या सर्व नियमांची पूर्तता करत आणि साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. ‘श्रीं’ ची स्थापना,दररोजची पुजा  आणि विविध समाजोपयोगी  उपक्रम याविषयी शासकीय नियमावली लक्षात घेऊन चर्चा करण्यात आली. नुतन कार्यकारिणीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार