MB NEWS-*ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शस्त्रक्रिया शिबीराचा होणार शुभारंभ !* *🕳️आजपासून आरोग्य सेवा सप्ताहातील नेत्र शस्त्रक्रियांना अंबाजोगाई व परळीत सुरुवात*🕳️*

 *ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शस्त्रक्रिया शिबीराचा होणार शुभारंभ !*



*🕳️आजपासून आरोग्य सेवा सप्ताहातील नेत्र शस्त्रक्रियांना अंबाजोगाई व परळीत सुरुवात*🕳️*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       परळी येथील आरोग्य सेवा सप्ताहात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या नेत्ररोग तपासणी शिबिरात शिफारस करण्यात आलेल्या ५०० रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत असुन आज शुक्रवारपासून (दि.६) आरोग्य सेवासप्ताहातील नेत्र शस्त्रक्रियांना अंबाजोगाई व परळीत सुरुवात होणार आहे.पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत शस्त्रक्रिया शिबीराचा शुभारंभ होणार आहे.या शस्त्रक्रियेसाठी २० रुग्णांना परळी येथुन रवाना करण्यात आले.

              राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त 15 ते 22 जुलै राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आरोग्य सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांचे नेत्ररोग तपासणी शिबिर झाले. या शिबीरात जवळपास २००० रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.यापैकी ५०० रुग्णांचे शस्त्रक्रिया निदान करण्यात आलेले होते.अशा शस्त्रक्रिया आयोजकांच्या वतीने मोफत करुन देण्यात येत आहेत.या शस्त्रक्रिया स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई व उपजिल्हा रुग्णालय परळी येथे टप्प्या टप्प्याने कोव्हिडविषयक मर्यादांमुळे या शस्त्रक्रिया होणार आहेत. 

              आज शुक्रवारपासून (दि.६) आरोग्य सेवासप्ताहातील नेत्र शस्त्रक्रियांना अंबाजोगाई व परळीत सुरुवात होणार आहे. या शस्त्रक्रिया करण्यासाठी २० रुग्णांना पुर्व तपासणी करून रवाना करण्यात आले आहे.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधकारी,डॉ. संभाजी मुंडे, सरचिटणीस अनंत इंगळे, सुभाष वाघमारे,माणिकराव मुंडे,रवि मुळे,प्रा.शाम दासुद,शरद कावरे,वैजनाथ जोशी,धम्मा अवचारे,जयराम गोंडे,सय्यद अली आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार