MB NEWS-परळीत चोरट्यांना अनलाॅक: चोरट्यांचा थेट एटिएमवरच डल्ला मारण्याचा प्रयत्न; सीसीटीव्ही कॅमेर्याचे नुकसान

 परळीत चोरट्यांना अनलाॅक: चोरट्यांचा थेट एटिएमवरच डल्ला मारण्याचा प्रयत्न; सीसीटीव्ही कॅमेर्याचे नुकसान



परळी /प्रतिनिधी.....

      नाथ चित्रपट मंदिर समोरील एसबीआयचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न सीसीटीव्ही कॅमेरे चे नुकसान झाले आहे.शहरातील नाथ चित्र मंदिर समोरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आहे या एटीएम चे मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरे चे नुकसान करण्यात आले. शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून आर्थिक नुकसान नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सदरची घटना मध्यरात्रीच्या सुमारास झाल्याचा अंदाज असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे याचा मागोवा घेतला जात आहे. घटनास्थळी परळी शहर पोलिस चे पोलीस निरीक्षक हेमंत कदम, सपोनि अशोक खरात, पीएसआय मोहन जाधव, भताने, घटमल इतर कर्मचार्‍यांनी धाव घेतली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार