MB NEWS-माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दि.११ रोजी रक्तदान शिबिर* 🕳️ _मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन_

 *माजी नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दि.११ रोजी रक्तदान शिबिर*



🕳️ _मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन_


परळी वैजनाथ/ प्रतिनिधी......

      परळी शहरातील कर्तृत्ववान युवा नेतृत्व व परळीच्या सर्वांगीण विकासाचा मुख्यदुवा म्हणून यशस्वी कारकीर्द निर्माण केलेले माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर राबविण्यात येणार आहे. 

         बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्र मंडळ, परळी वै. बाजीराव भैय्या धर्माधिकारी मित्रमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10 पासून स्व. श्री. मणिक बाजीराव धर्माधिकारी सभागृह,आंबेवेस, परळी वैजनाथ येथे "रक्तदान शिबीर" आयोजित करण्यात आले आहे.दरवर्षी वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते. गेल्या 10 वर्षांपासुन सातत्याने घेण्यात येणारा हा सामाजिक उपक्रम ठरला आहे.दर वर्षी नवनविन रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्तदानाचे कार्य रूजविणे बाबत जागृती करणारा परळीतील हा उपक्रम ठरला आहे.रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे.रक्तदानासारख्या उदात्त कार्यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन बाजीराव भैया धर्माधिकारी मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!