MB NEWS-ना.धनंजय मुंडे व सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बचतगट बळकटीकरण विशेष योजना ! परळीमधील महिला बचतगटांना मिळणार प्रत्येकी १ लाखाचा "पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार स्वयंरोजगार निधी"

 ना.धनंजय मुंडे व सौ. राजश्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून बचतगट बळकटीकरण विशेष योजना !

 


परळीमधील महिला बचतगटांना मिळणार प्रत्येकी १ लाखाचा "पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार स्वयंरोजगार निधी"

परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

         राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे व सौ.राजश्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून आणि नगर परिषद गटनेते वाल्मीकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व विशेष प्रयत्नातून परळीमधील सर्व बचतगटांना "पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार स्वयंरोजगार निधी" योजना सुरू करण्यात येणार आहे.या अंतर्गत प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचे वार्षिक 4% व्याजदराने पतपुरवठा करण्यात येणार आहे.



        नाथ प्रतिष्ठान यांच्यावतीने सदर योजना राबविण्यात येणार आहे.स्वयंसहाय्यता बचतगटांचे बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने ही योजना निर्माण केली असून याचा सर्व बचतगटांना लाभ मिळणार आहे.याबाबत महिला बचतगटांच्या महिलांची बैठक घेण्यात आली.यावेळीउपस्थित सर्व महिलांना सौ.राजश्री धनंजय मुंडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा संबोधित केले व मार्गदर्शन केले.या कार्यक्रमास गटनेते वाल्मिकअण्णा कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, उपनगराध्यक्ष शकील कुरेशी, नगरसेवक चंदुलाल बियाणी,दिपक देशमुख, मुख्याधिकारी अरविंद मुंडे,गोविंद मुंडे,किशोर पारधे, वैजनाथ बागवाले, रवी मुळे,गौतम आगळे,शरद कावरे,अमर रोडे,संतोष रोडे, सतीश खेबाळे,नेहरकर मॅडम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


🕳️  *अशी असेल पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार स्वयंरोजगार निधी योजना .......*

    दरम्यान पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार स्वयंरोजगार निधी योजना ही बचतगट बळकटीकरण विशेष योजना राबविण्यात येणार आहे.नाथ प्रतिष्ठान च्या माध्यमातून ही योजना चालवली जाणार आहे. पतपुरवठा करण्यासाठी विविध पतसंस्थांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.बचतगटांना स्वयंरोजगारासाठी प्रत्येकी 1 लक्ष रुपयांचे वार्षिक 4% व्याजदराने पतपुरवठा होणार आहे.नाथ प्रतिष्ठान या निधीची तरतूद करणार असुन बचतगट बळकटीकरणला यामुळे मोठा हातभार लागणार आहे. बचतगटांनी यासाठी आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार