सुयशवार्ता: कु.साक्षी सायस रणखांबेचे १२ वी परिक्षेत ९४.१६ % गुण मिळवत घवघवीत यश
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) वतीने घेण्यात आलेल्या १२ वी परिक्षेत कु.साक्षी सायस रणखांबे हिने ९४.१६% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.विज्ञान शाखेतून तिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
१२वी परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.या परिक्षेत उखळी बु. येथील म.फुले कला व विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.साक्षी सायस रणखांबे हिने विज्ञान शाखेत ९४.१६ % गुण मिळविले आहेत.अभ्यासात सातत्य ठेवत ऑनलाइन सारख्या नव्या माध्यमाला आत्मसात करत तीने हे घवघवीत यश मिळवले आहेत.या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या यशाबद्दल तिचे संस्था सचिव नवनाथ मुजमुले, प्राचार्य व्ही.के.राठोड, प्राध्यापकवृंद, शिक्षक, कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा