MB NEWS-पिकविमा आंदोलकांचा सत्कार

 पिकविमा आंदोलकांचा सत्कार



सोनपेठ, दि.०३(प्रतिनिधी) : सोनपेठ तालुक्यातील पिकविम्याचे आंदोलन सातत्याने चालू ठेऊन शेतकऱ्यांना पीकविमा मिळवून देणाऱ्या विश्वंभर गोरवे व आंदोलकांचा सत्कार करण्यात आला. 

सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पिकविम्यासाठी २०१७ पासून आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचा तालुकभरात सत्कार केला जात आहे. पीक विम्याचा परिपूर्ण अभ्यास करून प्रशासकीय, न्यायालयीन व रस्त्यावरील आंदोलने करUन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीकविमा मिळवून देणाऱ्या विश्वमभर गोरवे, शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू, देविदास भुजबळ, माधव घुन्नर, शिवसेना शहरप्रमुख कृष्णा पिंगळे आदींचा सत्कार तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी केला. सोनपेठ, शिरशी, शेळगाव यासह तालुक्यातील अनेक गावांत या आंदोलक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नृसिंहसेठ झंवर, जनार्धन डुकरे, व्यंकटराव बागवाले, पांडुरंग गोरवे, भीमराव बिडवे, उमाकांत बागवाले, ठोंबरे, मुंजा खोसे, धोंडिबा धबडे, हनुमान कुऱ्हाडे, नगरसेवक सुनील बर्वे, मारोती रंजवे, लक्ष्मीकांत देशमुख, पांडुरंग सोळंके, शरद भोसले, बळीराम कांदे आदींची उपस्थिती होती. 

सोनपेठ फोटो: विश्वमभर गोरवे यांचा सत्कार करताना शेतकरी बांधव दिसत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !