MB NEWS-महाराष्ट्र बँकेच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्त परळीत उपोषण*

 *महाराष्ट्र बँकेच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्त परळीत उपोषण*



परळी वैजनाथ....

            येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत गृहकर्ज जाणीवपूर्वक विलंब करुन टाळाटाळ करत फाईल रिजेक्ट केल्याच्या निषेधार्थ उपोषण करण्यात येत असून शाखाधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी खातेदार मंजु वंजारे यांनी केली आहे.

 यासंदर्भात उपोषणकर्त्या मंजु नारायण वंजारे यांनी सांगितले की, २३ ऑक्टोबर २०२० रोजी आपल्या शाखेत गृहकर्जासाठी अर्ज केलेला होता, तो आज पर्यंत मंजूर करण्यात आला नाही, उलट दहा महिने विलंबानंतर बँकेच्या अधिकृत पॅनल वरील तीन वकिलांनी सकारात्मक अहवाल दिला असताना अँड. विजय केदार यांनी नकारात्मक अहवाल दिल्याचे कारण पुढे केले आहे. यापूर्वी शहरातील वकीलांनी सर्वे नंबर ४६०६ मधील जागा रजिस्टरीसाठी योग्य असल्याचा अहवाल दिलेला आहे. परंतु अँड विजय केदार यांनी जाणीवपूर्वक नकारात्मक अहवाल दिला. त्याला कसलाही ठोस पुरावा नाही. विजय केदार म्हणतात की प्रॉपर्टी हस्तांतर करण्यास योग्य नाही जर असे असेल तर रजिस्टरी कार्यालयाने ही (खरीदी खत) रजिस्ट्री का करून दिली ? जिल्हाधिकाऱ्यांनी एन ए लेआउट करून का दिला ? रजिस्ट्री ऑफिस ने सदरील प्रॉपर्टी ची किंमत २३ लाख ५० हजार करून आमच्याकडून एक लाख रुपये महसूल का घेतला ? सदरील सर्वे नंबर ५७ चा सातबारा उतारा बंद झाल्याने त्या क्षेत्राचे नगरभूमापन कार्यालयाने सीटीएस ४६०६ हा नंबर नोंदणी करून दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार क्रमांक २१ जानेवारी २००६ पासून नगरभूमापन झालेल्या क्षेत्रात सातबारा उतारा बंद केला आहे. आम्ही नऊ महिने वाट पाहून उपोषणाचा अर्ज दिल्या नंतर शाखाधिकारी कुणाल यांना वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक तीन वकील सकारात्मक असताना एकट्यानेच नकारात्मक अहवाल दिला आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष घालून मला गृहकर्ज तात्काळ मंजूर करण्यात यावे. बँक मॅनेजर कुणाल शेखर यांना निलंबित करण्यात यावे ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या एडवोकेट विजय केदार यांची बँकेच्या लीगल पॅनल वरून हकालपट्टी करण्यात यावी यासाठी महाराष्ट्र बँकेच्या परळी वै.येथील शाखेसमोर माझ्या कुटुंबासह उपोषण करत असल्याचे त्यांनी सांगितले. निवेदनाच्या प्रती वरिष्ट कार्यालयास पाठवण्यात आलेल्या आहेत.

या उपोषणास बाजीराव भैय्या धर्माधिकारी (शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस) आनंत इंगळे, इंजि. भगवान साकसमुद्रे,देवराव लुगडे महाराज (ता.अ.संभाजी ब्रिगेड )सेवकराम जाधव ,विश्वनाथ गायकवाड,नामदेव भालेराव, पवन माने ,,केशव गायकवाड , पंडित झिंजुर्डे मिलिंद घाडगे सुरेश रोडे रवी मुळे विजय क्षिरसागर आकाश देवरे डॉक्टर माणिक दादा कांबळे, झाकिर पठाण अमर सूर्यवंशी धम्मा अवजारे शरद कावरे प्रकाश देशमुख प्रा.एम एल देशमुख केशव गायकवाड ,सय्यद ,अलिभाई,दामू सर नागेश हावळे प्राध्यापक विजय मुंडे ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड जगदीश शिंदे बाबा शेख यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार