MB NEWS- *सुयशवार्ता:अथर्व गणेगांवकर यांची स्थापत्य अभियांत्रिकी पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी जगप्रसिद्ध टेक्सास विद्यापीठात निवड*

 *सुयशवार्ता:अथर्व गणेगांवकर यांची स्थापत्य अभियांत्रिकी पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी जगप्रसिद्ध टेक्सास विद्यापीठात निवड*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       जगप्रसिद्ध असलेल्या अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात स्थापत्य अभियांत्रिकी पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी अथर्व शिल्पा प्रविण गणेगांवकर यांची निवड झाली आहे. या उत्तुंग यशस्वी वाटचालीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

        अथर्व गणेगांवकर हे परळीचे माजी गटशिक्षणाधिकारी  अशोकराव भातंब्रेकर व श्रीमती प्रतिमाताई भातंब्रेकर यांचे नातु आहेत.अथर्व यांचे शिक्षण पुणे येथे झालेले आहे.स्थापत्य अभियांत्रिकीच्या शिक्षणशाखेत पदव्युत्तर उच्च शिक्षणासाठी त्यांची जगप्रसिद्ध टेक्सास विद्यापीठात निवड झाली असुन बांधकाम व्यवस्थापन विषयातील पुढील उच्च शिक्षण व संशोधन ते करणार आहेत. लहानपणा पासुनच अतिशय बुद्धिमान व मेहनती अशी त्यांची ओळख आहे.त्याचप्रमाणे मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवारही आहे. संगीत,वादन या कलेतही त्यांची अभिरुची आहे.सर्वगुणसंपन्न व्यक्तीमत्त्व अशी त्यांची आप्तेष्ट व मित्रपरिवारात ओळख आहे.उच्च शिक्षणासाठी त्यांची झालेली ही निवड कौतुकास्पद असुन परळीकरांसाठी ही मोठी सुयशवार्ता आहे.या यशस्वी वाटचालीत त्यांची आई शिल्पाताई गणेगांवकर, वडील श्री.प्रविण गणेगांवकर, मामा अनिरुद्ध भातंब्रेकर व सर्व कुटुंबीयांचे मार्गदर्शन त्यांना लाभले.त्यांच्या या उत्तुंग यशस्वी वाटचालीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !