MB NEWS-सकल मराठा समाजाच्या मागणीला यश;पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यान जागा निश्चित* *मराठा भवनसाठी जागा देण्याचे ना.धनंजय मुंडे यांच्याकडून नगर परिषदेस आदेश*

 *सकल मराठा समाजाच्या मागणीला यश;पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यान जागा निश्चित*



 *मराठा भवनसाठी जागा देण्याचे ना.धनंजय मुंडे यांच्याकडून नगर परिषदेस आदेश*


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)

शुक्रवार दि 8 ऑगस्ट रोजी "मराठा भवन" साठी जागे संदर्भात राष्ट्रमाता जिजामाता उद्यान येथे बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत "मराठा भवन" साठी च्या जागे संदर्भात समाजाच्या मागणीची दखल घेऊन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी लागलीच जागा उपलब्ध करून देण्यासाठी नगर परिषदेला आदेशित करत, लवकरच "मराठा भवन" साठी इंडस्ट्रियल इरयातील जागा ताब्यात देण्यात येईल असे समाजाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. समाजाच्या "मराठा भवन" जागेसाठीचा खूप महत्वाचा प्रश्न मार्गी लागला. शहराच्या मध्यवर्ती जागा हवी या मागणी लक्षात घेता पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यान ही जागा लवकरच मराठा समाजाच्या ताब्यात देऊन त्या ठिकाणी भव्य असे "मराठा भवन" स्थापन होऊन समाजातील बऱ्याच गोष्टीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मराठा एकजुटीचा विजय झाला असून यापुढेही प्रत्येक विषयात मराठा समाजाने गट - तट, पक्ष - संघटना विरहित एकत्र येऊन काम करण्याची गरज असून बैठकी दरम्यान या विषयावर चर्चा होऊन समाजामध्ये समन्वय ठेवल्यानंतर कुठलाही प्रश्न तात्काळ मार्गी लागतो याचं "मराठा भवन" जागेच्या संदर्भातलं मूर्तिमंत उदाहरण आहे. परळी तालुक्यातील समाजाच्या मराठा भवनसाठी हा दिवस खूपच महत्वाचा आणि ऐतिहासिक असा ठरला आहे. मागणीची दखल घेऊन तात्काळ जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल सकल मराठा समाजाच्या वतीने परळीचे भूमिपुत्र पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !