MB NEWS-सोन्याची दुकान समजुन फोडली दुसरीच दुकाने; सिरसाळा येथे पाच दुकाने फोडण्याचा प्रयत्न

 सोन्याची दुकान समजुन फोडली दुसरीच दुकाने; सिरसाळा येथे पाच दुकाने फोडण्याचा प्रयत्न 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी... गावातील मुख्य रस्त्यावरील पाच दुकाने चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी(ता.5)पहाटे उघडकीस आला.याबाबत माहिती अशी की गावातील मुख्य रस्त्यावरील वैद्यनाथ स्टील सेंटर,संध्या कन्फेशनरी,आर्या साडी सेंटर,लहूदास ऍग्रो,व महाराष्ट्र ड्रेसेस या पाच दुकानाचे शटर चोरट्यांनी तोडले. दुकानातील दहा हजार रुपये किमतीचे कपडे,व नगदी तीन हजार रुपये लंपास केल्याचे सांगण्यात आले.या चोरट्यांचा मुख्य उद्देश सोन्याचा दुकान फोडण्याचा होता,परंतु सोन्याचे दुकानचे बॅनर पाहून ही दुकाने फोडण्यात आली आहेत. चोरट्यांनी धनश्री ज्वेलर्स या दुकानाचे सीसीटीव्ही तोडून शटर वाकवून दोन कुलपे तोडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.या घटनेने बाजारपेठेत खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले.पोलिसांनी या चोरट्यांचा तपास करण्याची मागणी होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!