MB NEWS-गावभागात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा; नागरीकांनी दिले निवेदन

गावभागात वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा; नागरीकांनी दिले निवेदन 



 परळी वैजनाथ ...

शहरातील गणेशपार भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी जुन्या गाव भागातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने वीज वितरण कार्यालयात उपकार्यकारी अभियंता यांना भेटून निवेदन दिले. 


गेल्या काही दिवसापासून गणेशपार भागातील, सावता माळी मंदिर परिसर, नांदूरवेस गल्ली, जंगम गल्ली, अंबेवेस, भिमनगर, साठे नगर, खंडोबा नगर, किर्ती नगर, कृष्णा नगर, तुळजा नगर, गंगासागर नगर, सिध्देश्वर नगर, खुदबे नगर, देशमुख गल्ली, धोकटे गल्ली, बंगला गल्ली आदी भागातील वीज पुरवठा सतत खंडीत केला जात आहे. दिवस भरात किमान वीस ते पंचवीस वेळा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. तसेच कमी दाबाने वीज पुरवठा होतो. यामुळे घरातील विद्दुत यंञे खराब होत आहेत. हा प्रकार केवळ शहरातील इतर विभागात लोड येत असल्याने गणेशपार भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. याच बरोबर नव्याने बसवण्यात आलेले ट्रान्स्फार्मर सुरू करावेत या मागणीसाठी आज नागरिकांनी उप कार्यकारी अभियंता प्रशांत आंबडकर व अभियंता कटके यांच्याशी चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले. यावेळी अश्विन मोगरकर यांनी गणेशपार भागातील विद्युत ग्राहकांच्या समस्या मांडल्या व लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत नाही झाला तर वीज वितरण कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. कार्यकारी अभियंता प्रशांत आंबडकर यांनी लवकरच या प्रश्नावर तोडगा काढून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे व गणेशपार भागातील वीज वितरण कर्मचाऱ्यांना निर्देश दिले. यापुढे सकाळी 7 ते 9 यावेळेतच परमिट घ्यावेत व दुरुस्ती बुधवारी या ठरलेल्या दिवशीच करण्याचे सक्त आदेश संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना  नगर परिषद सभापती गोपाळ आंधळे, भाजपा उपाध्यक्ष राजेंद्र ओझा, महादेव इतके, शिवसेना जिल्हा संघटक रमेश चौंडे, वीरशैव सभेचे शहर अध्यक्ष नितीन समशेट्टे, शिवसेना मा. उपशहर प्रमुख सचिन स्वामी, हनुमान आगरकर, गणेश पोपडे, अभिजित कस्तुरे  इत्यादी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !