पोस्ट्स

इमेज
  अरोही स्टाईल स्टुडीओच्या दांडीया महोत्सवास प्रारंभ महिला पोलीस कर्मचार्यांच्या हस्ते उद्घाटन,दररोज विविध स्पर्धांमध्ये आकर्षक बक्षीसे परळी (प्रतिनिधी)  परळी शहरातील अरोही स्टाईल स्टुडीओ च्या संचालिका,सामाजीक कार्यकर्त्या सौ.श्रध्दा गजानन हालगे- फुलारी यांच्या वतिने आयोजीत बेलवाडी येथे दांडीया स्पर्धेस प्रारंभ झाला या दांडीयाचे महिला पोलिस कर्मचार्यांच्या हस्ते व विविध क्षेत्रातील महिलांच्या उपस्थितीत शुक्रवार दि.4 ऑक्टोबर रोजी शुभारंभ करण्यात आला.या दांडीयामध्ये महिलांसाठी खेळ पैठणीचा,फॅशन शो,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धेतून दररोज आकर्षक बक्षीसे देण्यात येत आहेत.    परळी शहरातील महिलांना आपल्याच भागात दांडीया खेळाचा आनंद घेता यावा यासाठी अरोही स्टाईल स्टुडीओच्या वतिने नवरात्रोत्सवात प्रभु वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या गुरुलिंगस्वामी मठ,बेलवाडी येथे दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत नारीशक्ती दांडीया महोत्सवाचे आयोजन केले आहे.यामध्ये फॅशन शो,खेळ पैठणीचा,आरती ताट सजावट व दांडीया स्पर्धा घेण्यात येत आहेत.तसेच दररोज वेगवेगळ्या स्पर्धा घेवुन यातील विजेत्या महिलांना पेंटेवार कल

आधीच रेंजची बोंब :आता मोबाइल नेटवर्क संबंधित बीटीएस कार्डांचीच हिवरा गोवर्धन केंद्रातून चोरी

इमेज
आधीच रेंजची बोंब :आता मोबाइल नेटवर्क संबंधित बीटीएस कार्डांचीच हिवरा गोवर्धन केंद्रातून चोरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...         बीएसएनएल या दूरसंचार कंपनीच्या रेंजची अगोदरच बोंबाबोंब असते. आता तर परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन येथील बीएसएनएल केंद्रावरील मोबाईल नेटवर्क संबंधित बीटीएस कार्डची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही चोरी तज्ञ चोरांनीच केली असण्याची शक्यता जास्त आहे. याप्रकरणी सिरसाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        मोबाइल नेटवर्कच्या पायाभूत  सुविधांमधील  मोबाईल वाहक बेस ट्रान्सीव्हर स्टेशन्स (BTS) ची  प्रणाली असते. BTS प्रणाली हा GSM नेटवर्कचा भाग आहे. जो मोबाईल फोनवरून रेडिओ सिग्नल्स घेतो आणि प्रसारणाचे काम करते.  बेस ट्रान्सीव्हर स्टेशन हे टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञान आणि मोबाईल नेटवर्कचा एअर इंटरफेसचे उपकरण असते.       परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन येथील बीएसएनएल केंद्रावरील मोबाईल नेटवर्क संबंधित बीटीएस कार्डची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या बी टी एस कार्ड चे महत्व व त्याचे हाताळणी हे साध्यासुध्या चोरांना माहीत असणे शक्य नाही त्यामुळे ज्यां

“चिऊ मला माफ कर, जरांगे तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय..”; भावनिक चिठ्ठी लिहित मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं

इमेज
  “चिऊ मला माफ कर, जरांगे तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय..”; भावनिक चिठ्ठी लिहित मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं        बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर काही तरुणांनी आत्महत्या केल्या. ही घटना ताजी असतानाच प्रसाद देठे या बार्शीतल्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवलं आहे. एक भावनिक चिठ्ठी लिहून या तरुणाने आत्महत्या केली आहे. मूळचे बार्शीचे असणारे प्रसाद देठे हे पुण्यात एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांनी आत्महत्या केली. प्रसाद देठेंनी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे. जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा. मला माफ करा. तुमचाच प्रसाद मराठा आरक्षणासाठी प्रसाद देठेंचा जरांगेंना होता पाठ

भोपला तलावात पोहायाला गेलेला युवक बुडाला : शोधकार्य सुरु

इमेज
भोपला तलावात पोहायाला गेलेला युवक बुडाला : शोधकार्य सुरु परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....       परळीजवळील भोपला तलावात पोहायाला गेलेला एक युवक बुडाला असुन शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी ८.३० वा.घडली.दरम्यान, युवक तलावात बुडाल्याच्या घटनेने खळबळ उडाली असुन परिसरातील नागरिक तलावावर जमा झाले आहेत.          परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील भोपला येथील तलावात एक युवक पाण्यात बुडाला आहे.आज दि 19 रोजी सकाळी ८.३० वा.सुमारास कान्हेरवाडी येथील काही युवक भोपला येथील तलावावर पोहण्यासाठी गेले होते. यातील गणेश माणिकराव फड (वय 20)  हा युवक तलावात बुडाला आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. परळी नगर पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्याची मोहीम अद्याप सुरू आहे.पोलीस घटनास्थळी असुन परिसरातील नागरिक तलावावर जमा झाले आहेत.

विनापरवाना जागेवर ताबा केला: सुरु बांधकाम थांबवण्यास गेलेल्या व्यावसायिकास शिविगाळ व मारहाण

इमेज
विनापरवाना जागेवर ताबा केला: सुरु बांधकाम थांबवण्यास गेलेल्या व्यावसायिकास शिविगाळ व मारहाण परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....        भागीदारीमधील प्लॉटमध्ये आरोपींनी विनापरवाना प्रवेश करुन त्यावर ताबा मारुन बांधकाम करत असताना थांबवण्यास गेलेल्या व्यावसायिकास शिविगाळ,मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील व्यावसायिक फिर्यादी राहुल अरुण टाक यांच्या भागीदारीमधील स.नं. 323 मधील प्लॉट नं. 246 क्रमांकाचे प्लॉटमध्ये आरेफ सय्यद, गफारशा सय्यद व  इतर दोन अनोळखी ईसम या आरोपीतांनी विनापरवाना प्रवेश करुन त्यावर ताबा मारुन बांधकाम करत असताना राहूल टाक हे बांधकाम थांबवा असे म्हणाले असता यातील आरोपींनी हातात विटा घेवुन फिर्यादीचे अंगावर धावून येत धक्काबुक्की केली. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन परळी वैजनाथ शहर पोलीस ठाण्यात गुरनं 88/2024 कलम  452,323,504,506.34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि शिंदे  हे करीत आहेत.

वाहन खरेदी विक्री व्यवहारात झोल

इमेज
वाहन खरेदी विक्री व्यवहारात झोल : नांदेड जिल्ह्य़ातील खरेदीदाराची फसवणुक: परळीतील एकाविरुद्ध गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी....            वाहन खरेदी विक्री व्यवहारात झोल करुन खरेदीदाराची फसवणुक व विश्वासघात केल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्य़ातील खरेदीदाराच्या फिर्यादीवरून परळीतील एकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.             याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, योगेश बालाजी जक्केवाड वय 23 वर्षे व्यवसाय, ड्रायव्हर रा. पुंगराला ता. नायगाव जि. नांदेड या फिर्यादीने आरोपी अविनाशं धोंडीबा वडुळकर रा. परळी वैजनाथ यांच्याकडुन स्वीफ्ट डिजायर वाहन क्र MH-14 GU-3563 ही 5,66,800 रुपयात खरेदी केली होती. खरेदी वेळी 1,30,000 रुपये नगदी कॅश दिले व वरील उर्वरीत रक्कम या वाहनावर असलेले लोन 4,36,800 रुपये हे दर महीन्याचे 16 तारखेला 15,600 रुपयाचा हप्ता भरणे बाबत जबाबदारी बॉन्ड करून घेण्याचे ठरले होते.ही गाडी फिर्यादीच्या ताब्यात आल्यानंतर फिर्यादी व साक्षीदार यांचे फोन पे वरून आरोपी अविनाश वडुळकर याच्या फोन पे वर 3,94,900 रुपये पाठवले. त्यानंतर फिर्यादीचे भावाचे फोन

बीएमडब्ल्यू सौदा करुन नेली : साडेदहा लाख दिलेच नाही ; फसवणुकीचा गुन्हा दाखल

इमेज
बीएमडब्ल्यू सौदा करुन नेली : साडेदहा लाख दिलेच नाही ; फसवणुकीचा गुन्हा दाखल परळी वैजनाथ, प्रतिनिधी....    बीएमडब्ल्यूचा सौदा करु नेली मात्र दोन वर्षे झाले तरी सौद्यात ठरलेले साडेदहा लाख दिलेच नाही.याप्रकरणी आता छत्रपती संभाजीनगर येथील तीन जण व मुंबईचा एकजण अशा चौघांविरुद्ध परळी वैजनाथ शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी अमोल वामन चव्हाण वय 28 वर्षे व्यवसाय शेती व व्यापार रा. वसंतनगर तांडा ता. परळी वै.यांच्याशी आरोपींनी संगणमत करुन फिर्यादीचे मालकीची सन 2021 मध्ये कार साउंन्ड बायींग सेलींग ऑफ कार्स मुंबई (जुने गाडीचे लक्झरीचे विक्रेते) यांचेकडुन जुनी वापरती BMW कंपनीचे मॉडेल 730 ID कार क्रं. MH 04 EF 0016 पांढ- या रंगाची किंमत अंदाजे 13,70,000/- (तेरा लाख सत्तर हजार रुपये) माझ्या घरगुती वापरासाठी खरिदी केलेली होती.  सन 2022 मधे माझ्या ओळखीचे इसम नामे 1) शोयब खान रा. छ. संभाजीनगर हा त्याचे ओळखीचे ईसम नामे 2) मुजीब कुरेशी 3) नयीम कुरेशी दोन्ही रा. छत्रपती संभाजीनगर यांना माझी BMW कार खरेदी करण्यासा

आषाढी पालखी सोहळ्यात 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम

इमेज
शरद पवार यंदा अनुभवणार वारी: 'एक दिवस तरी वारी'उपक्रमात होणार सहभागी ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे ह.भ.प. भारत महाराज जाधव, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी , काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांचाही सहभाग... ----------------------------------------------       पंढरपुरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम राबविला जातो. साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,  कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार या वारीत सहभागी होणार आहेत. त्यांच्या सोबत काँग्रसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार , जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे ह.भ.प. भारत महाराज जाधव, मार्मिक साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर, कवी अरुण म्हात्रे, अभिव्यक्ती चॅनलचे रविंद्र पोखरकर आदी मान्यवर  सहभागी होणार  आहेत.   'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम गेली दहा वर्षे राबविला जात आह

इंजेगावच्या सालगड्याची मुलगी होणार डॉक्टर, सरपंचांनी कौतुक करीत पाठीवर टाकली कौतुकाची थाप

इमेज
  इंजेगावच्या सालगड्याची मुलगी होणार डॉक्टर, सरपंचांनी कौतुक करीत पाठीवर टाकली कौतुकाची थाप कु. वैष्णवी मुंडेसह आई-वडिलांचा केला सत्कार, वैष्णवीची कामगिरी अभिमानास्पद - सौ. विद्या अमोल कराड परळी वैजनाथ प्रतिनिधी     इंजेगाव येथील अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या कु. वैष्णवी भरत मुंडे हिने नीट परीक्षेत मिळवलेले यश हे ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब आहे तर नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे असे उद्गार सरपंच सौ. विद्या अमोल कराड यांनी आज काढले. सरपंचांनी इंजेगावची भूमिकन्या कु. वैष्णवी भरत मुंडे हिचा तिच्या आई-वडिलांसह सत्कार करून तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. यावेळी तिच्या आई वडील आणि उपस्थिताना गहिवरून आले होते.         इंजेगाव येथे सालगडी म्हणून काम करणारे भरत पांडुरंग मुंडे यांची मुलगी कु. वैष्णवी मुंडे हिने नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये 637 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. घरची अतिशय हलाखीची परिस्थिती असतानाही वैष्णवी मुंडेने अभ्यास करू हे संपादन केल्याबद्दल ग्रामस्थांकडून तिचे कौतुक केले जात आहे. तिच्या या खडतर यशाची विविध वृत्तपत्रांनी आणि प्रसार माध्यमांनीही दखल

दुष्काळ, शेतकरी, पीककर्ज, महिला सबलीकरणासह मांडले महत्वपुर्ण मुद्दे

इमेज
खासदार म्हणून बजरंग सोनवणेंची पहिल्या बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीस प्रमुख उपस्थिती   बीड,प्रतिनिधी....      बीड लोकसभेत निवडून आल्यानंतर  खासदार म्हणून बजरंग सोनवणेंची पहिल्या बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीस प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत दुष्काळ, शेतकरी, पीककर्ज, महिला सबलीकरणासह अन्य  महत्वपुर्ण मुद्दे त्यांनी मांडले. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली.         सन २०२०-२१ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा मिळालेला नाही. यासाठी शेतकरी उपोषण करतात, आंदोलन करतात, परंतु त्यांना न्याय का मिळत नाही. शेतकर्यांना पिकविमा मिळाला पाहिजे अशी मागणी खा. बजरंग सोनवणे यांनी यावेळी बैठकीत मांडली. जिल्ह्यात वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. महिला सबलीकरणासाठी जास्तीचा निधी देणे आवश्यक असून या विषयाकडे गांभिर्याने पहावे, बीड जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला आहे. सदरील शेतकऱ्यांना वेळेत पिककर्ज उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी बँका शेतकऱ्यांची आडवणूक करत आहेत, अश

इंजिनियरिंगसाठी च्या घेण्यात येणाऱ्या सीईटी परिक्षेत अर्जुन जोशी यांचे नेत्रदीपक यश

इमेज
इंजिनियरिंगसाठी च्या घेण्यात येणाऱ्या सीईटी परिक्षेत अर्जुन जोशी यांचे नेत्रदीपक यश परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....         महाराष्ट्र राज्याच्या वतीने इंजिनियरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी  परिक्षे चा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. या परिक्षेत अर्जुन जोशी याने नेत्रदीपक यश  संपादन केले आहे.           इंजिनियरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी या परीक्षेमध्ये अर्जुन अजय जोशी याला  फिजिक्स 98.5 , मॅथ 98.6 तर केमेस्ट्री 85.3 असे एकूण 97.79% पर्सेंन्टाईल एवढे गुण घेऊन नेत्रदीपक यश संपादन केले आहे. अर्जुनने न्यू हायस्कूल परळी वैजनाथ येथून 12 वी शिकून लातूर येथे चौधरी क्लासेस लातूर येथे कोचिंग घेतले होते. तो वैद्यनाथ विद्यालय परळी वै  येथील हेड क्लर्क  रमाकांतराव जोशी व विजयाबाई जोशी यांचा नातू असून क्रीडा शिक्षक अजय जोशी यांचा मुलगा आहे.          त्याच्या या यशाबद्दल न्यू हायस्कूल चे प्रा.  सुनील चव्हाण,बाळासाहेब देशमुख तसेच वैद्यनाथ विद्यालय शिक्षक वृंद, क्रिडा शिक्षक संघटना, जोशी आखाडा मित्र मंडळ , चौधरी क्लासेस चे संचालक श्री मनोज चौधरी, अरविंद चौधरी तसेच अर्जुनचा मित्र

पंकजा मुंडे वडीगोद्रीत ; प्रा.लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला दिली भेट

इमेज
पंकजा मुंडे वडीगोद्रीत ; प्रा.लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला दिली भेट वंचितांच्या लढ्यासाठी मी सोबत ; सरकारने हे उपोषण सन्मानाने सोडवावं जालना ।दिनांक १७। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज संध्याकाळी वडीगोद्री येथे ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची उपोषण स्थळी जावून भेट घेतली. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता. दरम्यान वंचितांच्या लढ्यात मी या दोघांसोबत आहे. सरकारने सन्मानाने त्यांचे उपोषण सोडवून न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.   मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीला धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. आज संध्याकाळी पंकजाताईंनी उपोषणाला भेट देऊन आपला पाठिंबा व्यक्त केला.     यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या, “दोन दिवस झाले मी अत्यंत विचित्र तीव्र दुःखी भावनांना सामोरे गेले आहे. मला भेटल्या भेटल्या लक्ष्मण दादा रडायला लागले. ताई, तुमच्या पराभवामुळे चार लोकांनी आत्महत्या केल्या, मला बघून रडू येतंय. परिस्थिती हाताळत असल्याने याला कोणतंही राजकीय

शासनाची भूमिका माय-बापाची असावी

इमेज
प्रा.लक्ष्मण हाके आणि सहकाऱ्यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने बघावे- पंकजा मुंडेंचे ट्विट शासनाची भूमिका माय-बापाची असावी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...       प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे.अशा प्रकारचे ट्विट भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केलं आहे.        ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी जालन्यातील वडीगोद्री येथे प्रा. लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचे उपोषण सुरू आहे. त्यांनी पाणी देखील सोडले आहे. पाणी सोडल्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. या अनुषंगानेच पंकजा मुंडे यांनी ट्विट करून सरकारचे लक्ष वेधले आहे. आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी लक्ष्मण हाके यांच्याशी सरकारच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी त्यांनी या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याचे सांगत राज्य सरकारवर निशाणा साधला. "राज्याचे शासन आणि

शिवसेना नेते संजय भांबरे यांचे परळी शिवसैनिकांच्या वतीने स्वागत

इमेज
आगामी निवडणूका शिवसेना ताकदीने लढणार व जिंकणार-संजय भांबरे शिवसेना नेते संजय भांबरे यांचे परळी शिवसैनिकांच्या वतीने स्वागत परळी/प्रतिनिधी शिवसेनेचे परळी विधानसभा संपर्क प्रमुख संजय भांबरे हे आज शनिवार दिनांक 15 जुन रोजी परळी शहरात आले असता परळीत शिवसैनिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान आगामी नगर परिषद, विधानसभा तसेच सर्व निवडणूका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ताकदीने लढणार व जिंकणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परळी विधानसभा संपर्क प्रमुख संजय भांबरे यांनी बोलतांना केले. शिवसेना नेते तथा परळी विधानसभा संपर्क प्रमुख संजय भांबरे यांचा आज शनिवारी परळीत दौर्‍यानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी आगामी नगर परिषद, विधानसभा निवडणूकासंदर्भात चर्चा केली. प्रारंभी शिवसैनिकांनी त्यांचे भगवी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.  यावेळी शिवसेनेचे मा.उपजिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर, शिवसेना तालुकाप्रमुख भोजराज पालिवाल, जेष्ठ नेते सतीश जगताप, माजी नगरसेवक रमेश चौडे, युवा नेते संजय कुकडे, संजय सोमणे, श्रीनिवास सावजी, मो

आमरण उपोषणाला वडीगोद्री गावामध्ये जाऊन दिला पाठिंबा!

इमेज
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार - प्रा.टी.पी.मुंडे प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला वडीगोद्री गावामध्ये जाऊन दिला पाठिंबा! परळी वैजनाथ, प्रतिनिधी  ओबीसींच्या प्रश्नासाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावामध्ये प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे हे आमरण उपोषण करत आहेत.ओबीसीच्या न्याय हक्कासाठी तसेच आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी केले. या आमरण उपोषणाला त्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला.    मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी व समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासंदर्भात उपोषण केले होते. परंतु त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला असल्याने उपोषण स्थगित केले त्याच्या विरोधात ओबीसीचे नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ओबीसीचे आरक्षण हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारे असून ते आरक्षण मराठा समाजाला देता कामा नये व सगेसोयरे

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम ......!

इमेज
डॉक्टर, इंजिनियर विद्यार्थी घडविण्याऐवजी जबाबदार नागरिक घडविण्याची शाळांची जबाबदारी-सौ. श्रद्धा चनाखेकर नांदेड - दि. १५जून २०२४ डॉक्टर इंजिनियर विद्यार्थी घडविण्यापेक्षा या देशाचे जबाबदार व संवेदनशील, पर्यावरण संवर्धक नागरिक घडविण्याची शाळांची जबाबदारी आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर अभ्यासेतर उपक्रम, छंद, खेळ यात सहभागी होणे गरजेचे आहे. सध्या पालकांना केवळ मोठ्या इमारती व सूटबूट , टाय मधील विद्यार्थ्यांच्या शाळा पसंत पडत असल्या तरी अशा शाळांमधून केवळ परीक्षार्थी विद्यार्थी घडविले जातात.परंतु भौतिक सुविधा कमी असतानाही लहान शाळांमधूनही संस्कारक्षम शिक्षण व गुणवत्ता मिळू शकते हे भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित  नांदेडच्या कै. नाना पालकर प्राथमिक शाळेने सिद्ध केले आहे असे प्रतिपादन नांदेड येथील सुप्रसिद्ध गायिका तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा चनाखेकर यांनी केले. तसेच स्पर्धा परिक्षांमधून यश मिळवणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशाचे दाखले त्यांनी यावेळी दिले.  भारतीय शिक्षण प्रसारक संस्था संचलित कै. नाना पालकर प्राथमिक शाळेमध्ये शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमप्रसंगी विद

आर्थिक मदतीसह पोपटराव यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार - धनंजय मुंडे

इमेज
आत्महत्या केलेल्या पोपटराव वायभासे यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली भेट निवडणुका, जय-पराजय होत राहतात मात्र त्यातून कुणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब - धनंजय मुंडे आर्थिक मदतीसह पोपटराव यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार - धनंजय मुंडे आष्टी (दि. 14) - लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्याच्या दुःखात आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी गावच्या पोपटराव वायभासे या तरुणाने आत्महत्या केली होती. आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वायभासे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.  निवडणुकांमध्ये जय - पराजय होत असतात मात्र या विवंचनेतून कोणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे. कुटुंबासाठी देखील हे कधीही न भरून निघणारे मोठे दुःख आहे, त्यामुळे संयमाने जय-पराजय घ्यावेत. कोणतीही निवडणूक अंतिम नसते. कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, अशा शब्दात यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  दरम्यान मयत पोपटराव यांस एक मुलगा, मुलगी व पत्नी असा परिवा

इंजेगावच्या कु. वैष्णवी मुंडेला नीट परीक्षेत 637 गुण, ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव

इमेज
  बापाची जिद्द अन् लेकीची मेहनत: शेतमजुराची मुलगी होणार डॉक्टर! इंजेगावच्या कु. वैष्णवी मुंडेला नीट परीक्षेत 637 गुण, ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव परळी वैजनाथ, प्रतिनिधी...     महत्त्वकांक्षापुढे भल्या भल्या अडचणीही गुडघे टेकतात, हे फक्त ऐकले होते. पण येथे मात्र ते प्रत्यक्षात बघायला आणि अनुभवायला मिळाले. इंजेगाव येथील एका सालगड्याची मुलगी चक्क नीट परीक्षेत तब्बल 637 गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. आई आणि वडील दोघेही दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करतात आणि त्यांना साधी अक्षर ओळख ही नाही, मात्र वडिलांच्या जिद्दीला आणि मुलीच्या मेहनतीला फळ मिळाले. इंजेगाव येथील वैष्णवी भरत मुंडे हिने नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये 637 गुण घेऊन घऊघवीत यश मिळवले. या यशाचा ग्रामस्थांना अभिमान असून तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे. वैष्णवी मुंडे मात्र याचे सर्व श्रेय आपले आई-वडील आणि शिक्षकांना देते.         भरत पंढरीनाथ मुंडे आणि चांगुणाबाई मुंडे या इंजेगाव येथील दंपत्याची वैष्णवी ही मुलगी... अल्पभूधारक शेतकरी असलेले भरत मुंडे हे इतरांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करतात. त्या

आर्थिक मदतीसह पांडुरंगच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार - धनंजय मुंडे

इमेज
आत्महत्या केलेल्या पांडुरंग सोनवणेच्या कुटुंबियांची पालकमंत्री धनंजय मुंडेंनी घेतली भेट निवडणुका, जय-पराजय होत राहतात मात्र त्यातून कुणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब - धनंजय मुंडे आर्थिक मदतीसह पांडुरंगच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार - धनंजय मुंडे अंबाजोगाई (दि. 14) - लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्याच्या दुःखात अंबाजोगाई तालुक्यातील डिगोळ आंबा गावच्या पांडुरंग सोनवणे या तरुणांनी आत्महत्या केली होती आज जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोनवणे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.  निवडणुकांमध्ये जय - पराजय होत असतात मात्र या विवंचनेतून कोणी आपला जीव गमवावा, ही आमच्या मनात अपराधीपणाची भावना उत्पन्न करणारी बाब आहे. कुटुंबासाठी देखील हे कधीही न भरून निघणारे मोठे दुःख आहे, त्यामुळे संयमाने जय-पराजय घ्यावेत. कोणतीही निवडणूक अंतिम नसते. कुणीही टोकाचा निर्णय घेऊ नये, अशा शब्दात यावेळी धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  दरम्यान मयत पांडुरंग सोनवणे (वय 33) यांस एक मुलगा, मुलगी,
इमेज
  पंकजाताई मुंडे परवा आत्महत्याग्रस्त तरूणांच्या कुटुंबियांना भेटणार बीड ।दिनांक १४। पराभव जिव्हारी लागल्याने आत्महत्या केलेल्या तरूणांच्या कुटुंबियांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे परवादिवशी भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार आहेत. जीव देऊन भागणार नाही बाळांनो..माझी शपथ आहे तुम्हाला स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ नका असं आवाहन काल त्यांनी केलं होतं.    नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांचा निसटता पराभव झाल्याने कार्यकर्ते सैरभर झाले. अशातच हा पराभव जिव्हारी लागल्याने सचिन मुंडे (येस्तार ता. अहमदपूर), पांडुरंग सोनवणे (डिघोळ अंबा ता. अंबाजोगाई), पोपट वायबसे (चिंचेवाडी बीड) यांनी स्वतःचे जीवन संपवले. तरूणांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कार्यकर्त्यांच्या मृत्यूने पंकजाताई मुंडेंना अतिशय वेदना झाल्या, त्यांनी दूरध्वनीवरून त्यांचं सांत्वनही केलं होतं. यासंदर्भात   त्यांनी व्हिडिओ शेअर करून तरूणांना संयम राखण्याचे देखील आवाहन केलेले आहे.    दरम्यान, पंकजाताई मुंडे  परळीत येत असून परवा  त्या कुटुंबियांना भेटण्यासाठी संबंधित गावात

महिला व मुलींच्या स्वरक्षण शिबिर तथा संस्कार वर्गाचा वृक्षारोपण करून समारोप सोहळा

इमेज
महिला व मुलींच्या स्वरक्षण शिबिर तथा संस्कार वर्गाचा वृक्षारोपण करून समारोप सोहळा    (परळी वै) :प्रतिनिधी                            येथील महर्षी दयानंद व्यायाम शाळा, आर्य समाज यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला व मुली स्वसंरक्षण शिबिर तथा संस्कार वर्गाचा समारोप सोहळा पालकांच्या आणि असंख्य शिबिरार्थ्यांच्या उपस्थितीत हर्ष उल्हासात संपन्न झाला. *चांगल्या सवयीने चांगला माणूस घडतो व चांगला माणूस चांगले राष्ट्र घडवतो* हेच जणू काही ब्रीदवाक्य असलेल्या आर्य समाज परळी च्या अध्यक्ष श्री जुगलकिशोरजी लोहिया,मंत्री श्री उग्रसेन राठोड व सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शहरातील मुली व महिला साठी हे सुसंस्कृत,गुणवान,चरित्रवान, बुद्धिवान व बलवान व्हावेत या उदात्त हेतूने आर्य समाज परळी वैजनाथ अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक बालिका व युवत्नी अगदी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला होता. या शिबिरात तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने  शिबिरार्थ्यांना शारीरिक व्यायाम, कसरती, रोप मल्लखांब, दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी, लाठी-काठी व विविध खेळाद्वारे शारीरिक व बौद्धिक विकास स

समन्वयातून प्रश्न सोडवा: भाविकांना दिलासा द्या

इमेज
वैजनाथ देवल कमिटी व पुरोहित संघाने आपसात सुसंवाद साधून भाविकांची गैरसोय दूर करावी -अभयकुमार ठक्कर पुरोहितांच्या हस्ते जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यास परवानगी द्यावी परळी वैजनाथ, प्रतिनिधी  वैद्यनाथ देवल कमिटीने पुरोहित संघासाठी अभिषेक संदर्भात घालून दिलेल्या अटी जाचक आहेत या अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी पुरोहित संघाने सुरू केलेले आंदोलन योग्य आहे तरी भाविकांची सोय लक्षात घेता देवल कमिटी व पुरोहितांनी आपसामध्ये योग्य समन्वय साधावा व समस्त भाविकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना नेते तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे  वैद्यनाथ देवल कमिटीने पुरोहित वर्गासाठी घालून दिलेले नियम जाचक असून पुरोहित संघाची अभिषेक सुरू ठेवण्याची पूर्वपार व परंपरागत पद्धत सुरू ठेवावी ही मागणी योग्य असून वैजनाथ मंदिर विश्वस्त समिती व त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या पुरोहित संघाने भाविकांची सोय लक्षात घेऊन आपसात योग्य समन्वय साधावा अशी मागणी समस्त भाविक वर्ग, परळीकर व आम जनतेतून होत आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पंचम ज्योतिर्लिंग असल्याने प्रभू वैजनाथ मंदिरातील

प्रासंगिक लेख>>>>रंगकर्मींचे विद्यापीठ: गुरुवर्य मार्गदर्शक स्मृतिशेष प्रा.केशवराव देशपांडे

इमेज
रंगकर्मींचे विद्यापीठ: गुरुवर्य मार्गदर्शक स्मृतिशेष प्रा.केशवराव देशपांडे सरांचा आज स्मृतीदिन! आदरणीय गुरुवर्य प्रा. केशवराव देशपांडे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र वंदन..!! आदरणीय गुरुवर्य प्रा. केशवराव देशपांडे सरांचं असणं आमच्यासाठी लाखमोलाचं होतं..!निष्ठावान प्राध्यापक कसा असावा आणि त्या पेशाला पूर्णत्वाने कसे वाहून घ्यावे, हे जर का कुणाला शिकावयाचे असेल तर त्यांनी आमचे आदरणीय  गुरुवर्य स्मृतिशेष प्रा. केशवराव देशपांडे यांच्या जीवनकार्यावरून शिकावे. सरांचे, मार्गदर्शन आम्हांस लाभले हा आनंद शब्दातीत आहे.अनेक पिढ्यांवर उत्तम संस्कार करून त्यांचे आयुष्य घडविणाऱ्या  प्रा.केशवराव देशपांडे सरांना 'रंगकर्मींचे विद्यापीठ'असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.आज आपण जे काही आहोत ते प्रा.केशवराव देशपांडे सरांमुळे आहोत अशी भावना आजही आमच्या मनात जागृत आहे.  साधेपणाने जगताना जीवनावरची,माणूसकीवरची , कलेवरची श्रद्धा कशी वाढवावी याचे मार्गदर्शन आमच्या पिढीला लाभले ते सरांकडूनच. आपल्या व्यासंगी वृत्तीने आणि सर्जनशीलतेने अवघं  रंगभूमीविश्व व्यापून टाकणारे  गुरुवर्य प्रा. केशवराव देशपांडे यांच

कष्ट करुनही शेती पिकत नसल्याने वाघाळा येथील शेतकर्‍याची आत्महत्या

इमेज
कष्ट करुनही शेती पिकत नसल्याने वाघाळा येथील शेतकर्‍याची आत्महत्या  परळी वैजनाथ(प्रतिनिधी)  कष्ट करुनही शेती पिकत नसल्याने वाघाळा येथील 60 वर्षे वयाच्या वृध्द शेतकर्याने आपल्याच शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि.5 जुन रोजी घडली असुन याप्रकरणी दि.12 जुन रोजी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु म्हणुन नोंद करण्यात आली आहे.  परळी तालुक्यातील वाघाळा येथील शेतकरी संजय ग्यानबा सलगर वय 60 वर्षे हे गावातच आपली शेती करतात.मागील एक वर्षांपासुन शेती पिकत नसल्याने संजय सलगर हे चिंताग्रस्त होते.यातच दि.5 जुन रोजी त्यांनी आपल्याच शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.याप्रकरणी त्यांचा मुलगा भानुदास संजय सलगर यांच्या खबरीवरुन परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केकाण हे करत आहेत.

पक्षविरोधी कामगिरी केल्याप्रकरणी कारवाई

इमेज
  मुंडेंचे सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन  मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष राहिला आहे. पण या निवडणुकीत पक्षविरोधी कामगिरी केल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी आमदार नारायणराव मुंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. सहा वर्षांसाठी त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.       यासंदर्भातील अधिकृत निलंबनाचं पत्र समोर आलं असून यामध्ये म्हटलं की, लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळं विधानपरिषदेचे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संघटन आणि प्रशासनाची जबाबदारी सांभाळणारे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या सहीनं हे पत्र काढण्यात आलं आहे.

या बाबी पुर्ण करा अन्यथा मिळणार नाही अनुदान !

इमेज
  या बाबी पुर्ण करा अन्यथा मिळणार नाही अनुदान: निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना परळी वैजनाथ, प्रतिनिधी....     निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना तहसीलदार यांनी जारी केली असुन या सूचनेनुसार सांगण्यात आलेल्या या बाबी पुर्ण करा अन्यथा अनुदान मिळणार नाही.          सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा योजनेच्या लाभार्थीना सुचित करण्यात येते कि, माहे. एप्रिल-2024 पासून अनुदान DBT (Direct Beneficiary Trnasfer) ने वितरण करणे आसे शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने सर्व लाभार्थीनी आधार कार्ड बँक पासबुक लाभार्थीचा मोबाईल नंबर लिंक करण्यात यावे. तसेच योजनेचा प्रकार, जात प्रवर्ग, दिव्यांगाचा प्रकार व दिव्यांग टक्केवारी, राशन कार्ड (पिवळे/केशरी). व तसेच विधवा महिला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र यांची छायांकित प्रत संबंधित गावचे तलाठी यांच्याकडे दाखल करण्यात यावी. आपले आधार कार्ड व बँकपासबुकला मोबाईल नंबर ला लिंक नसल्यानंतर आपणास माहे. एप्रिल-2024 पासून अनुदान मिळणार नाही याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन तहसीलदार परळी वैजनाथ यांनी केले आहे.