बीएमडब्ल्यू सौदा करुन नेली : साडेदहा लाख दिलेच नाही ; फसवणुकीचा गुन्हा दाखल
बीएमडब्ल्यू सौदा करुन नेली : साडेदहा लाख दिलेच नाही ; फसवणुकीचा गुन्हा दाखल
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
बीएमडब्ल्यूचा सौदा करु नेली मात्र दोन वर्षे झाले तरी सौद्यात ठरलेले साडेदहा लाख दिलेच नाही.याप्रकरणी आता छत्रपती संभाजीनगर येथील तीन जण व मुंबईचा एकजण अशा चौघांविरुद्ध परळी वैजनाथ शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, फिर्यादी अमोल वामन चव्हाण वय 28 वर्षे व्यवसाय शेती व व्यापार रा. वसंतनगर तांडा ता. परळी वै.यांच्याशी आरोपींनी संगणमत करुन फिर्यादीचे मालकीची सन 2021 मध्ये कार साउंन्ड बायींग सेलींग ऑफ कार्स मुंबई (जुने गाडीचे लक्झरीचे विक्रेते) यांचेकडुन जुनी वापरती BMW कंपनीचे मॉडेल 730 ID कार क्रं. MH 04 EF 0016 पांढ- या रंगाची किंमत अंदाजे 13,70,000/- (तेरा लाख सत्तर हजार रुपये) माझ्या घरगुती वापरासाठी खरिदी केलेली होती. सन 2022 मधे माझ्या ओळखीचे इसम नामे 1) शोयब खान रा. छ. संभाजीनगर हा त्याचे ओळखीचे ईसम नामे 2) मुजीब कुरेशी 3) नयीम कुरेशी दोन्ही रा. छत्रपती संभाजीनगर यांना माझी BMW कार खरेदी करण्यासाठी ग्राहक म्हणून घेवुन आल्याने ओळख झाली होती. त्यानंतर दिनांक 17/12/2022 रोजी पंचायत समिती जवळ परळी वै येथे माझी BMW कार के. MH 04 EF 0016 ही शोयब खान याचे मार्फतीने त्यांचे ओळखीचे मुजीब कुरेशी व नयीम कुरेशी यांना रुपये 10,50,000/- (दहा लाख पंन्नास हजार रुपयाला 4) रफिक मेमन रा. मुंबई यांना रक्कम 10,50,000/-रुपये विक्री केली होती. त्यावेळी चौघांनी फिर्यादीची फसवणुक केली व पैसे देणेस टाळाटाळ केली म्हणुन शहर पोलीस ठाण्यात गुरनं. 89/2023 कलम 420,417,34 भादवि गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोना भताने हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा