इंजेगावच्या सालगड्याची मुलगी होणार डॉक्टर, सरपंचांनी कौतुक करीत पाठीवर टाकली कौतुकाची थाप

 इंजेगावच्या सालगड्याची मुलगी होणार डॉक्टर, सरपंचांनी कौतुक करीत पाठीवर टाकली कौतुकाची थाप

कु. वैष्णवी मुंडेसह आई-वडिलांचा केला सत्कार, वैष्णवीची कामगिरी अभिमानास्पद - सौ. विद्या अमोल कराड


परळी वैजनाथ प्रतिनिधी 

   इंजेगाव येथील अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या कु. वैष्णवी भरत मुंडे हिने नीट परीक्षेत मिळवलेले यश हे ग्रामस्थांसाठी अभिमानाची बाब आहे तर नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे असे उद्गार सरपंच सौ. विद्या अमोल कराड यांनी आज काढले. सरपंचांनी इंजेगावची भूमिकन्या कु. वैष्णवी भरत मुंडे हिचा तिच्या आई-वडिलांसह सत्कार करून तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. यावेळी तिच्या आई वडील आणि उपस्थिताना गहिवरून आले होते.

        इंजेगाव येथे सालगडी म्हणून काम करणारे भरत पांडुरंग मुंडे यांची मुलगी कु. वैष्णवी मुंडे हिने नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये 637 गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे. घरची अतिशय हलाखीची परिस्थिती असतानाही वैष्णवी मुंडेने अभ्यास करू हे संपादन केल्याबद्दल ग्रामस्थांकडून तिचे कौतुक केले जात आहे. तिच्या या खडतर यशाची विविध वृत्तपत्रांनी आणि प्रसार माध्यमांनीही दखल घेतली. आज गावच्या सरपंच सौ. विद्या अमोल कराड यांनी तिच्या घरी जाऊन यशाबद्दल अभिनंदन केले आणि तिच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. वैष्णवी मुंडे हिच्यासह वडील भरत मुंडे आणि आई चांगुनाबाई मुंडे यांचा शाल, श्रीफळ देऊन, फेटा बांधून व पुष्पहार घालून सत्कार केला. 

       यावेळी बोलताना सौ. विद्या अमोल कराड म्हणाल्या की, वैष्णवी मुंडेचे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्याने आयुष्यामध्ये चांगली सेवा करावी एवढीच तिच्याकडून अपेक्षा असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी तिच्या पावलावर पाऊल ठेवत चांगले गुण मिळवावेत असे आवाहन त्यांनी केले. 

     यावेळी सरपंच पती अमोल कराड, पोलीस पाटील हरिभाऊ कराड, दत्तात्रय मुंडे, बाबुराव कराड, प्रकाश कराड, माऊली पवार, भागवत कराड, मंगलबाई मुंडे, गजानन कराड, विकास कराड, शाम कराड आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?