इंजिनियरिंगसाठी च्या घेण्यात येणाऱ्या सीईटी परिक्षेत अर्जुन जोशी यांचे नेत्रदीपक यश
इंजिनियरिंगसाठी च्या घेण्यात येणाऱ्या सीईटी परिक्षेत अर्जुन जोशी यांचे नेत्रदीपक यश
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
महाराष्ट्र राज्याच्या वतीने इंजिनियरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परिक्षे चा निकाल नुकताच घोषित करण्यात आला. या परिक्षेत अर्जुन जोशी याने नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
इंजिनियरिंग प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी या परीक्षेमध्ये अर्जुन अजय जोशी याला फिजिक्स 98.5 , मॅथ 98.6 तर केमेस्ट्री 85.3 असे एकूण 97.79% पर्सेंन्टाईल एवढे गुण घेऊन नेत्रदीपक यश संपादन केले आहे.अर्जुनने न्यू हायस्कूल परळी वैजनाथ येथून 12 वी शिकून लातूर येथे चौधरी क्लासेस लातूर येथे कोचिंग घेतले होते. तो वैद्यनाथ विद्यालय परळी वै येथील हेड क्लर्क रमाकांतराव जोशी व विजयाबाई जोशी यांचा नातू असून क्रीडा शिक्षक अजय जोशी यांचा मुलगा आहे.
त्याच्या या यशाबद्दल न्यू हायस्कूल चे प्रा. सुनील चव्हाण,बाळासाहेब देशमुख तसेच वैद्यनाथ विद्यालय शिक्षक वृंद, क्रिडा शिक्षक संघटना, जोशी आखाडा मित्र मंडळ , चौधरी क्लासेस चे संचालक श्री मनोज चौधरी, अरविंद चौधरी तसेच अर्जुनचा मित्र परिवार यांच्या वतीने अर्जुनचे कौतुक करून अभिनंदन करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा