आधीच रेंजची बोंब :आता मोबाइल नेटवर्क संबंधित बीटीएस कार्डांचीच हिवरा गोवर्धन केंद्रातून चोरी
आधीच रेंजची बोंब :आता मोबाइल नेटवर्क संबंधित बीटीएस कार्डांचीच हिवरा गोवर्धन केंद्रातून चोरी
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
बीएसएनएल या दूरसंचार कंपनीच्या रेंजची अगोदरच बोंबाबोंब असते. आता तर परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन येथील बीएसएनएल केंद्रावरील मोबाईल नेटवर्क संबंधित बीटीएस कार्डची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही चोरी तज्ञ चोरांनीच केली असण्याची शक्यता जास्त आहे. याप्रकरणी सिरसाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाइल नेटवर्कच्या पायाभूत सुविधांमधील मोबाईल वाहक बेस ट्रान्सीव्हर स्टेशन्स (BTS) ची प्रणाली असते. BTS प्रणाली हा GSM नेटवर्कचा भाग आहे. जो मोबाईल फोनवरून रेडिओ सिग्नल्स घेतो आणि प्रसारणाचे काम करते. बेस ट्रान्सीव्हर स्टेशन हे टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञान आणि मोबाईल नेटवर्कचा एअर इंटरफेसचे उपकरण असते.
परळी तालुक्यातील हिवरा गोवर्धन येथील बीएसएनएल केंद्रावरील मोबाईल नेटवर्क संबंधित बीटीएस कार्डची चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या बी टी एस कार्ड चे महत्व व त्याचे हाताळणी हे साध्यासुध्या चोरांना माहीत असणे शक्य नाही त्यामुळे ज्यांना याचे ज्ञान आहे अशा तज्ञ चोरट्यांकडूनच हे कार्ड चोरी झाले असण्याची शक्यता जास्त आहे. याप्रकरणी सिरसाळा पोलीस ठाण्यात हिवरा गोवर्धन येथील बीएसएनएल केंद्रावरील सात बीटीएस कार्ड चोरी गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सिरसाळा पोलीस ठाण्याचे पो.ह.आशिष शेंगुळे हे करीत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा