पंकजाताई मुंडे परवा आत्महत्याग्रस्त तरूणांच्या कुटुंबियांना भेटणार




बीड ।दिनांक १४।

पराभव जिव्हारी लागल्याने आत्महत्या केलेल्या तरूणांच्या कुटुंबियांची भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे परवादिवशी भेट घेऊन त्यांचं सांत्वन करणार आहेत. जीव देऊन भागणार नाही बाळांनो..माझी शपथ आहे तुम्हाला स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेऊ नका असं आवाहन काल त्यांनी केलं होतं.


   नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजाताई मुंडे यांचा निसटता पराभव झाल्याने कार्यकर्ते सैरभर झाले. अशातच हा पराभव जिव्हारी लागल्याने सचिन मुंडे (येस्तार ता. अहमदपूर), पांडुरंग सोनवणे (डिघोळ अंबा ता. अंबाजोगाई), पोपट वायबसे (चिंचेवाडी बीड) यांनी स्वतःचे जीवन संपवले. तरूणांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कार्यकर्त्यांच्या मृत्यूने पंकजाताई मुंडेंना अतिशय वेदना झाल्या, त्यांनी दूरध्वनीवरून त्यांचं सांत्वनही केलं होतं. यासंदर्भात   त्यांनी व्हिडिओ शेअर करून तरूणांना संयम राखण्याचे देखील आवाहन केलेले आहे.


   दरम्यान, पंकजाताई मुंडे  परळीत येत असून परवा  त्या कुटुंबियांना भेटण्यासाठी संबंधित गावात जाणार आहेत, त्यांचं सांत्वन करून धीर देणार आहेत. दरम्यान गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने आत्महत्या केलेल्या तरूणांच्या कुटुंबियांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार