भोपला तलावात पोहायाला गेलेला युवक बुडाला : शोधकार्य सुरु
भोपला तलावात पोहायाला गेलेला युवक बुडाला : शोधकार्य सुरु
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
परळीजवळील भोपला तलावात पोहायाला गेलेला एक युवक बुडाला असुन शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी ८.३० वा.घडली.दरम्यान, युवक तलावात बुडाल्याच्या घटनेने खळबळ उडाली असुन परिसरातील नागरिक तलावावर जमा झाले आहेत.
परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील भोपला येथील तलावात एक युवक पाण्यात बुडाला आहे.आज दि 19 रोजी सकाळी ८.३० वा.सुमारास कान्हेरवाडी येथील काही युवक भोपला येथील तलावावर पोहण्यासाठी गेले होते. यातील गणेश माणिकराव फड (वय 20) हा युवक तलावात बुडाला आहे. त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. परळी नगर पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्याची मोहीम अद्याप सुरू आहे.पोलीस घटनास्थळी असुन परिसरातील नागरिक तलावावर जमा झाले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा