दुष्काळ, शेतकरी, पीककर्ज, महिला सबलीकरणासह मांडले महत्वपुर्ण मुद्दे
खासदार म्हणून बजरंग सोनवणेंची पहिल्या बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीस प्रमुख उपस्थिती
बीड,प्रतिनिधी....
बीड लोकसभेत निवडून आल्यानंतर खासदार म्हणून बजरंग सोनवणेंची पहिल्या बीड जिल्हा नियोजन समिती बैठकीस प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत दुष्काळ, शेतकरी, पीककर्ज, महिला सबलीकरणासह अन्य महत्वपुर्ण मुद्दे त्यांनी मांडले. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली.
सन २०२०-२१ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा मिळालेला नाही. यासाठी शेतकरी उपोषण करतात, आंदोलन करतात, परंतु त्यांना न्याय का मिळत नाही. शेतकर्यांना पिकविमा मिळाला पाहिजे अशी मागणी खा. बजरंग सोनवणे यांनी यावेळी बैठकीत मांडली. जिल्ह्यात वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी त्यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. महिला सबलीकरणासाठी जास्तीचा निधी देणे आवश्यक असून या विषयाकडे गांभिर्याने पहावे, बीड जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळला आहे. सदरील शेतकऱ्यांना वेळेत पिककर्ज उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. ज्या ठिकाणी बँका शेतकऱ्यांची आडवणूक करत आहेत, अशा ठिकाणी बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, ज्याठिकाणी बँकाचे अधिकारी चांगले काम करत आहेत, अशांचा सत्कारही करू. परंतू शेतकऱ्यांना विना अडथळा कर्ज मिळाले पाहिजे, यासाठी प्रयत्न करावेत. बीड जिल्हा परिषद इमारतीच्या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासह महापुरूषांचे पुतळे उभारण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणीही यावेळी त्यांनी बैठकीत केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा