वाहन खरेदी विक्री व्यवहारात झोल
वाहन खरेदी विक्री व्यवहारात झोल : नांदेड जिल्ह्य़ातील खरेदीदाराची फसवणुक: परळीतील एकाविरुद्ध गुन्हा दाखल
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
वाहन खरेदी विक्री व्यवहारात झोल करुन खरेदीदाराची फसवणुक व विश्वासघात केल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्य़ातील खरेदीदाराच्या फिर्यादीवरून परळीतील एकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, योगेश बालाजी जक्केवाड वय 23 वर्षे व्यवसाय, ड्रायव्हर रा. पुंगराला ता. नायगाव जि. नांदेड या फिर्यादीने आरोपी अविनाशं धोंडीबा वडुळकर रा. परळी वैजनाथ यांच्याकडुन स्वीफ्ट डिजायर वाहन क्र MH-14 GU-3563 ही 5,66,800 रुपयात खरेदी केली होती. खरेदी वेळी 1,30,000 रुपये नगदी कॅश दिले व वरील उर्वरीत रक्कम या वाहनावर असलेले लोन 4,36,800 रुपये हे दर महीन्याचे 16 तारखेला 15,600 रुपयाचा हप्ता भरणे बाबत जबाबदारी बॉन्ड करून घेण्याचे ठरले होते.ही गाडी फिर्यादीच्या ताब्यात आल्यानंतर फिर्यादी व साक्षीदार यांचे फोन पे वरून आरोपी अविनाश वडुळकर याच्या फोन पे वर 3,94,900 रुपये पाठवले. त्यानंतर फिर्यादीचे भावाचे फोन पे वरुन 49,100 रुपये पाठवले.
त्यानंतर फिर्यादिचे वाहनाचा अॅक्सीडेंट झाल्याने फिर्यादी हे आरोपी अविनाशं धोंडीबा वडुळकर यास पोलीस स्टेशन येथुन गाडी सोडवण्यासाठी मुळ मालक व कागदपत्र लागत आहे असे म्हणाले. त्यावेळी अविनाश वडुळकर हा फिर्यादिला म्हणाला कि, हे वाहन माझे मालकीचे नसुन मित्र नागेश पांडुरंग वाघमारे रा. भोसे ता. मंगळवेढा जि. सोलापुर याचेकडुन खरेदी केलेले आहे. त्यावेळी फिर्यादीस आरोपी अविनाश वडुळकर याने नागेश वाघमारे याच्याकडुन बॉन्डवर ही गाडी तिस-या व्यक्तीला विक्री करता येणार नाही असे असतांना हा बॉन्ड आरोपीने दाखवला नाही व फिर्यादीस गाडीचे काही हफ्ते आरोपी नागेश पांडुरंग वाघमारेयाचे फोन पे वर टाक असे सांगितले.
फिर्यादी याने नागेश यांना फोन करून पोलीस स्टेशन येथुन गाडी सोडवण्यासाठी मुळ मालक व कागदपत्र लागत आहे तुम्ही या असे म्हणाले. त्यावेळी नागेश वाघमारे यांनी गाडीचे काही हफ्ते रुकलेले आहेत असे सांगितले असता फिर्यादिचे फोन पे वरून 31,100 रुपये व त्याचे भावाचे फोन पे वरून 15,000 रुपये तसेच कोर्टाचे व पोलीस स्टेशनच्या कामकाजासाठी येण्याजाण्याच्या खर्चासाठी नगदी कैंश 20,000 दिले. काही दिवसानी गाडी सोडवुन आणल्या नंतर दोन ते तीन हफ्ते राहील्याने दि.17/02/2024 रोजी ए.यु स्मॉल फायनान्स कर्मचारी यांनी हे वाहन ओढून आरोपीने आजपर्यंत दिलेले हफ्ते पाठवले नसुन फिर्यादीस काही न सांगता स्मॉल फायनान्स येथुन आरोपी क्र 2 नागेश वाघमारे यांने परस्पर गाडी घेवुन गेले व भरलेले हफ्ते 4,26,000 व नगदी पैसे 90,000 असे एकुण 5,16,000 रुपयाची यातील आरोपी दोघांनी संगणमत करून फिर्यादीची फरावणुक व विश्वासघात केला म्हणुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शिंदे हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा