आमरण उपोषणाला वडीगोद्री गावामध्ये जाऊन दिला पाठिंबा!
ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार - प्रा.टी.पी.मुंडे
प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला वडीगोद्री गावामध्ये जाऊन दिला पाठिंबा!
परळी वैजनाथ, प्रतिनिधी
ओबीसींच्या प्रश्नासाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री गावामध्ये प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे हे आमरण उपोषण करत आहेत.ओबीसीच्या न्याय हक्कासाठी तसेच आरक्षणाच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे प्रतिपादन ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी केले. या आमरण उपोषणाला त्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शवला.
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी व समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासंदर्भात उपोषण केले होते. परंतु त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारला एक महिन्याचा कालावधी दिला असल्याने उपोषण स्थगित केले त्याच्या विरोधात ओबीसीचे नेते प्रा. लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. ओबीसीचे आरक्षण हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसणारे असून ते आरक्षण मराठा समाजाला देता कामा नये व सगेसोयरे कायद्याला विरोध या दोन्ही मागणीसाठी जालना येथील वडीगोद्री या गावांमध्ये गेल्या तीन दिवसापासून सुरू आहे. याच आंदोलनाला ओबीसी बहुजन पार्टीचा पाठिंबा दर्शवण्यासाठी प्रा.टी.पी.मुंडे सर यांनी आंदोलनस्थळी भेट घेतली. सरकारने मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्यावे परंतु ओबीसी मध्ये आरक्षण दिल्यास सरकारला ओबीसी समाज त्यांची जागा दाखवून देईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
या अगोदर सुद्धा मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे व सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली होती परंतु त्यांच्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून आणि ओबीसीचे आरक्षण आबादीत ठेवण्यासाठी ओबीसीचे महाराष्ट्रातील नेते त्यामध्ये छगन भुजबळ , प्रकाश अण्णा शेंडगे, प्रा.टी.पी.मुंडे सर यांचा सिंहाचा वाटा आहे. २२ एल्गार सभा घेऊन ओबीसी समाजामध्ये जनजागृती निर्माण केली त्यांनी जरांगेच्या मागणीला कडाडून विरोध दर्शवला परिणामी सरकारने मराठा समाजास वेगळे दहा टक्के आरक्षण दिले परंतु आता सुद्धा पुन्हा जरांगे यांनी तीच मागणी केल्याने ओबीसी समाज प्रचंड आक्रमक झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा