इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

शिवसेना नेते संजय भांबरे यांचे परळी शिवसैनिकांच्या वतीने स्वागत

आगामी निवडणूका शिवसेना ताकदीने लढणार व जिंकणार-संजय भांबरे


शिवसेना नेते संजय भांबरे यांचे परळी शिवसैनिकांच्या वतीने स्वागत


परळी/प्रतिनिधी

शिवसेनेचे परळी विधानसभा संपर्क प्रमुख संजय भांबरे हे आज शनिवार दिनांक 15 जुन रोजी परळी शहरात आले असता परळीत शिवसैनिकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान आगामी नगर परिषद, विधानसभा तसेच सर्व निवडणूका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ताकदीने लढणार व जिंकणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे परळी विधानसभा संपर्क प्रमुख संजय भांबरे यांनी बोलतांना केले.

शिवसेना नेते तथा परळी विधानसभा संपर्क प्रमुख संजय भांबरे यांचा आज शनिवारी परळीत दौर्‍यानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी शिवसैनिकांशी आगामी नगर परिषद, विधानसभा निवडणूकासंदर्भात चर्चा केली. प्रारंभी शिवसैनिकांनी त्यांचे भगवी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. 

यावेळी शिवसेनेचे मा.उपजिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर, शिवसेना तालुकाप्रमुख भोजराज पालिवाल, जेष्ठ नेते सतीश जगताप, माजी नगरसेवक रमेश चौडे, युवा नेते संजय कुकडे, संजय सोमणे, श्रीनिवास सावजी, मोहन परदेशी, किशन बुंदेले आदींसह शिवसैनिक, पदाधिकारी सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट