या बाबी पुर्ण करा अन्यथा मिळणार नाही अनुदान !
या बाबी पुर्ण करा अन्यथा मिळणार नाही अनुदान: निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना तहसीलदार यांनी जारी केली असुन या सूचनेनुसार सांगण्यात आलेल्या या बाबी पुर्ण करा अन्यथा अनुदान मिळणार नाही.
सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा योजनेच्या लाभार्थीना सुचित करण्यात येते कि, माहे. एप्रिल-2024 पासून अनुदान DBT (Direct Beneficiary Trnasfer) ने वितरण करणे आसे शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने सर्व लाभार्थीनी आधार कार्ड बँक पासबुक लाभार्थीचा मोबाईल नंबर लिंक करण्यात यावे. तसेच योजनेचा प्रकार, जात प्रवर्ग, दिव्यांगाचा प्रकार व दिव्यांग टक्केवारी, राशन कार्ड (पिवळे/केशरी). व तसेच विधवा महिला असेल तर मृत्यू प्रमाणपत्र यांची छायांकित प्रत संबंधित गावचे तलाठी यांच्याकडे दाखल करण्यात यावी. आपले आधार कार्ड व बँकपासबुकला मोबाईल नंबर ला लिंक नसल्यानंतर आपणास माहे. एप्रिल-2024 पासून अनुदान मिळणार नाही याची नोंद घेण्यात यावी असे आवाहन तहसीलदार परळी वैजनाथ यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा