इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

विनापरवाना जागेवर ताबा केला: सुरु बांधकाम थांबवण्यास गेलेल्या व्यावसायिकास शिविगाळ व मारहाण

विनापरवाना जागेवर ताबा केला: सुरु बांधकाम थांबवण्यास गेलेल्या व्यावसायिकास शिविगाळ व मारहाण

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

       भागीदारीमधील प्लॉटमध्ये आरोपींनी विनापरवाना प्रवेश करुन त्यावर ताबा मारुन बांधकाम करत असताना थांबवण्यास गेलेल्या व्यावसायिकास शिविगाळ,मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील व्यावसायिक फिर्यादी राहुल अरुण टाक यांच्या भागीदारीमधील स.नं. 323 मधील प्लॉट नं. 246 क्रमांकाचे प्लॉटमध्ये आरेफ सय्यद, गफारशा सय्यद व  इतर दोन अनोळखी ईसम या आरोपीतांनी विनापरवाना प्रवेश करुन त्यावर ताबा मारुन बांधकाम करत असताना राहूल टाक हे बांधकाम थांबवा असे म्हणाले असता यातील आरोपींनी हातात विटा घेवुन फिर्यादीचे अंगावर धावून येत धक्काबुक्की केली. शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन परळी वैजनाथ शहर पोलीस ठाण्यात गुरनं 88/2024 कलम  452,323,504,506.34 भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि शिंदे  हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....