इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा तिसऱ्या दिवशी लागला शोध  परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र,  या युवकाचा कोणताही पत्ता लागत नव्हता. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू होते. अखेर आज सकाळी अकोला येथून बोलावलेल्या विशेष पथकाने  तलावातून या युवकाचा मृतदेह बाहेर काढला आहे. तीन दिवसानंतर बेपत्ता युवकाचा शोध लागला आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्य...

कष्ट करुनही शेती पिकत नसल्याने वाघाळा येथील शेतकर्‍याची आत्महत्या

कष्ट करुनही शेती पिकत नसल्याने वाघाळा येथील शेतकर्‍याची आत्महत्या 


परळी वैजनाथ(प्रतिनिधी)

 कष्ट करुनही शेती पिकत नसल्याने वाघाळा येथील 60 वर्षे वयाच्या वृध्द शेतकर्याने आपल्याच शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि.5 जुन रोजी घडली असुन याप्रकरणी दि.12 जुन रोजी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु म्हणुन नोंद करण्यात आली आहे.

 परळी तालुक्यातील वाघाळा येथील शेतकरी संजय ग्यानबा सलगर वय 60 वर्षे हे गावातच आपली शेती करतात.मागील एक वर्षांपासुन शेती पिकत नसल्याने संजय सलगर हे चिंताग्रस्त होते.यातच दि.5 जुन रोजी त्यांनी आपल्याच शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.याप्रकरणी त्यांचा मुलगा भानुदास संजय सलगर यांच्या खबरीवरुन परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास केकाण हे करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या