पक्षविरोधी कामगिरी केल्याप्रकरणी कारवाई
मुंडेंचे सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र काँग्रेसला घवघवीत यश मिळालं आहे. महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष राहिला आहे. पण या निवडणुकीत पक्षविरोधी कामगिरी केल्याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी आमदार नारायणराव मुंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. सहा वर्षांसाठी त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.
यासंदर्भातील अधिकृत निलंबनाचं पत्र समोर आलं असून यामध्ये म्हटलं की, लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळं विधानपरिषदेचे माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या संघटन आणि प्रशासनाची जबाबदारी सांभाळणारे उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्या सहीनं हे पत्र काढण्यात आलं आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा