परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

इंजेगावच्या कु. वैष्णवी मुंडेला नीट परीक्षेत 637 गुण, ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव

 बापाची जिद्द अन् लेकीची मेहनत: शेतमजुराची मुलगी होणार डॉक्टर!


इंजेगावच्या कु. वैष्णवी मुंडेला नीट परीक्षेत 637 गुण, ग्रामस्थांकडून कौतुकाचा वर्षाव


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    महत्त्वकांक्षापुढे भल्या भल्या अडचणीही गुडघे टेकतात, हे फक्त ऐकले होते. पण येथे मात्र ते प्रत्यक्षात बघायला आणि अनुभवायला मिळाले. इंजेगाव येथील एका सालगड्याची मुलगी चक्क नीट परीक्षेत तब्बल 637 गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. आई आणि वडील दोघेही दुसऱ्याच्या शेतामध्ये मोलमजुरी करतात आणि त्यांना साधी अक्षर ओळख ही नाही, मात्र वडिलांच्या जिद्दीला आणि मुलीच्या मेहनतीला फळ मिळाले. इंजेगाव येथील वैष्णवी भरत मुंडे हिने नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये 637 गुण घेऊन घऊघवीत यश मिळवले. या यशाचा ग्रामस्थांना अभिमान असून तिच्यावर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव होत आहे. वैष्णवी मुंडे मात्र याचे सर्व श्रेय आपले आई-वडील आणि शिक्षकांना देते. 

       भरत पंढरीनाथ मुंडे आणि चांगुणाबाई मुंडे या इंजेगाव येथील दंपत्याची वैष्णवी ही मुलगी... अल्पभूधारक शेतकरी असलेले भरत मुंडे हे इतरांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करतात. त्यामुळे गरिबी आणि आर्थिक अडचण ही पाचवीला पुजलेली... भरत मुंडे यांना दोन्ही मुलीच... वैष्णवी अत्यंत हुशार असल्याने आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही भरत मुंडे यांनी तिला परळी येथील न्यू हायस्कूल शाळेमध्ये शिकवले. दहावीला तब्बल 98.60 टक्के गुण घेत तिने वडीलांनी टाकलेला विश्वास सार्थ करुन दाखवला. तिच्या या यशाने भरत मुंडे यांची छाती अभिमानाने भरून आली. वैष्णवीला अगदी लहानपणापासूनच डॉक्टर होण्याची इच्छा होती आणि दहावीला मिळालेल्या गुणांनी तिची ही इच्छा अधिक तीव्र झाली. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे ती निराश व्हायची. भरत मुंडे यांनी वैष्णवीची इच्छा पूर्ण करण्याचा निश्चयच केला आणि तिला तसे सांगितलेही. 

        वडिलांचा आधार आणि प्रोत्साहन मिळताच वैष्णवीने आपल्या डॉक्टर होण्याच्या इच्छेला बळ दिले. दहावीच्या परीक्षेत 98.60% गुण मिळाल्याने लातूर येथील दयानंद सायन्स कॉलेज येथे प्रवेश घेतला आणि अभ्यासक्रमात सोबतच नीट परीक्षेच्या अभ्यासालाही गती दिली. जोरदार प्रयत्न करूनही पहिल्या प्रयत्नात तिला यश मिळाले नाही मात्र तिने खचून न जाता पुन्हा जोमाने प्रयत्न सुरू केले. वडील भरत मुंडे यांनीही पोटाला चिमटा दिला मात्र लेकीच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही. वडिलांच्या साथीला आई चांगुणाबाई ही खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि इतरांच्या शेतामध्ये काम करून पै पै जमा केली आणि लेकीच्या शिक्षणासाठी पैसा लावला.  अखेर  बापाच्या जिद्दीला आणि लेकीच्या मेहनतीला फळ मिळालेच. नीट परीक्षेच्या नुकत्याच लागलेल्या निकालामध्ये वैष्णवी भरत मुंडे हिरा तब्बल 637 गुण मिळाले आणि तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.

मुलीची इच्छा पूर्ण करायची एवढेच ध्येय होते - भरत मुंडे

       आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे लाडकी मुलगी वैष्णवी हिची डॉक्टर होण्याची इच्छा अपूर्ण राहू नये म्हणून हातात पडेल ते काम केले. आपल्या आर्थिक परिस्थितीचा फटका मुलीच्या स्वप्नाला बसू नये म्हणून आम्ही जास्तीत जास्त मेहनत केली, पण तिला पैसे कमवत पडू दिले नाहीत. वैष्णवीनेही आमच्या मेहनतीचे पांग फेडले. गावात लोकांना वाटायचे याची मुलगी काय डॉक्टर होणार परंतु वैष्णवी नेते करून दाखवले याचा मला अतिशय आनंद आणि अभिमान आहे. काहीही करून वैष्णवीला डॉक्टर करायचे एवढेच ध्येय होते आणि तेवढेच ठरवून मी आणि माझ्या पत्नीने काम केले. आमच्या मेहंदीचे चीज झाले आणि वैष्णवी जिद्दीलाही फळ मिळाले याचा आम्हालाच नाही तर संपुर्ण गावाला सुद्धा आनंद आणि अभिमान आहे.

आई-वडिलांचे श्रम वाया गेले नाही याचा अभिमान

      आमची कौटुंबिक परिस्थिती अतिशय गरीब असल्याने माझे दहावीनंतर शिक्षण होईल की नाही असा प्रश्न होता. मात्र आई आणि वडिलांनी तू फक्त शिक्षणावर लक्ष दे, बाकीचे आम्ही बघू, असा शब्द देऊन पाठीवर आधाराची थाप मारली आणि मी सुद्धा पुन्हा मागे फिरून न पाहता केवळ अभ्यासाकडे लक्ष दिले. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर मी खूप निराश झाले होते आणि अनेकांचे टोमणे ही ऐकून घेतले. मात्र आई आणि वडिलांनी खचून जाऊ नको तू प्रयत्न कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत असा आधार दिला आणि त्यामुळेच मी आज हे यश संपादन करू शकले. मी लहानपणी बघितलेले स्वप्न आज साकार होत असल्याचा आनंद वेगळा आहे.

      - वैष्णवी मुंडे , विद्यार्थिनी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!