प्रासंगिक लेख>>>>रंगकर्मींचे विद्यापीठ: गुरुवर्य मार्गदर्शक स्मृतिशेष प्रा.केशवराव देशपांडे

रंगकर्मींचे विद्यापीठ: गुरुवर्य मार्गदर्शक स्मृतिशेष प्रा.केशवराव देशपांडे सरांचा आज स्मृतीदिन!


आदरणीय गुरुवर्य प्रा. केशवराव देशपांडे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र वंदन..!!

आदरणीय गुरुवर्य प्रा. केशवराव देशपांडे सरांचं असणं आमच्यासाठी लाखमोलाचं होतं..!निष्ठावान प्राध्यापक कसा असावा आणि त्या पेशाला पूर्णत्वाने कसे वाहून घ्यावे, हे जर का कुणाला शिकावयाचे असेल तर त्यांनी आमचे आदरणीय

 गुरुवर्य स्मृतिशेष प्रा. केशवराव देशपांडे यांच्या जीवनकार्यावरून शिकावे. सरांचे, मार्गदर्शन आम्हांस लाभले हा आनंद शब्दातीत आहे.अनेक पिढ्यांवर उत्तम संस्कार करून त्यांचे आयुष्य घडविणाऱ्या  प्रा.केशवराव देशपांडे सरांना 'रंगकर्मींचे विद्यापीठ'असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.आज आपण जे काही आहोत ते प्रा.केशवराव देशपांडे सरांमुळे आहोत अशी भावना आजही आमच्या मनात जागृत आहे.  साधेपणाने जगताना जीवनावरची,माणूसकीवरची ,

कलेवरची श्रद्धा कशी वाढवावी याचे मार्गदर्शन आमच्या पिढीला लाभले ते सरांकडूनच.

आपल्या व्यासंगी वृत्तीने आणि सर्जनशीलतेने अवघं  रंगभूमीविश्व व्यापून टाकणारे  गुरुवर्य प्रा. केशवराव देशपांडे यांचा १४ जून  स्मृतिदिन. त्यांच्या जाण्याने नाटयविश्वात न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली.आमचे सांस्कृतिक छत्र हरपले!

आदरणीय सरांनी आयुष्यातील सर्वाधिक काळ रंगभूमीला दिला होता. त्यांनी या कारकिर्दीमध्ये अत्यंत सुंदर अशा नाट्यकृती आणि अविस्मरणीय आठणींची शिदोरी दिली.विविध क्षेत्रातील दिग्गजांच्या प्रिय व्यक्तींच्या हृदयात सर होते आणि असतीलही. नाटयसृष्टीत त्यांना जितका आदर मिळाला, तितकाच इतर क्षेत्रातील लोकांकडूनही मिळाला.

त्यांच्या आयुष्यात नट-दिग्दर्शक म्हणून जितकी ख्याती मिळवली त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक ख्याती नाट्यगुरु म्हणून मिळवली.

गुरुजी सोबत तासनतास  नाटय-वाङमयीन गप्पांच्या मैफिली रंगायच्या अशा आठवणी सांगताना  नकळत त्या काळाची सफर घडते.सर आणि वाचन हे एक समीकरणच! आमच्यातही सरांनीच वाचनाची आवड निर्माण केल्याचे आवर्जून सांगावेसे वाटते.  आपण काय वाचत आहोत हे सर  उत्साहाने सांगत असत.त्यांची कथन शैली अनुपमच!  त्यांनी लिहिलेले रंगभूमीवरील लेखही नियतकालिकांमधून आणि वर्तमानपत्रांमधून प्रकाशित झाले आहेत.

शेती,माती, शेतकरी म्हणजे सरांचा जिव्हाळ्याचा विषय. शेतकरी संघटनेचे काम त्यांनी मनोभावे केले.

राज्यातील जनतेला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने ते व्यथित होत असत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नशील असत.

सर  उत्तम अभिनेते होते आणि आम्हां विद्यार्थ्यांवर अपार प्रेम करणारे गॉडफादरही होते. सर कलावंत, गुरू आणि माणूस म्हणूनही मोठे होते.

वेगवेगळ्या विषयांची त्यांना केवळ माहितीच नसे, तर त्याबाबतचे त्यांचे आकलनही आश्चर्यकारक होते. विशेष म्हणजे त्यांची स्मरणशक्ती दांडगी म्हणावी, अशी होती.

आतून-बाहेरून अत्यंत गोड. अर्थात त्यांना समजून घेण्यासाठी  त्यांच्या कसोटीला तुम्हाला उतरावे लागे. त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण झालात तर ज्ञानाचे भांडार तुम्हाला मिळाले, म्हणून समजा.आम्ही खरोखरच भाग्यवान सरांनी आम्हांला मुक्त हस्ते ज्ञानदान केले.

आदरणीय देशपांडे सरांनी

अफाट लोकसंग्रह जमा केला, ते कल्पनेतही न बसणारे. रंगभूमी समृद्ध करण्यासाठी त्यांची लेखणी-वाणी प्रवाही असायची.रंगभूमी-नाटक हे एक व्रत आहे, ही सरांची भूमिका होती. केवळ आपले नाव चमकविण्यासाठी रंगभूमीवर लुडबूड करायची नाही, हे त्यांनी सर्वांना सांगितले. रंगभूमी ही सामाजिक बांधीलकी असून ती लोकांसाठी करायची असते. ती लोकांच्या उपयोगी पडली पाहिजे, ही भूमिका ते वेळोवेळी मांडायचे. 

 रंगकर्मींचे श्रद्धेय केशवराव देशपांडे सर हे चालते बोलते विद्यापीठ होते.त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!

🙏🏵️🙏

✒️    सिद्धार्थ तायडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार