समन्वयातून प्रश्न सोडवा: भाविकांना दिलासा द्या

वैजनाथ देवल कमिटी व पुरोहित संघाने आपसात सुसंवाद साधून भाविकांची गैरसोय दूर करावी -अभयकुमार ठक्कर



पुरोहितांच्या हस्ते जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यास परवानगी द्यावी


परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

वैद्यनाथ देवल कमिटीने पुरोहित संघासाठी अभिषेक संदर्भात घालून दिलेल्या अटी जाचक आहेत या अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी पुरोहित संघाने सुरू केलेले आंदोलन योग्य आहे तरी भाविकांची सोय लक्षात घेता देवल कमिटी व पुरोहितांनी आपसामध्ये योग्य समन्वय साधावा व समस्त भाविकांना दिलासा द्यावा अशी मागणी शिवसेना नेते तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे केली आहे 


वैद्यनाथ देवल कमिटीने पुरोहित वर्गासाठी घालून दिलेले नियम जाचक असून पुरोहित संघाची अभिषेक सुरू ठेवण्याची पूर्वपार व परंपरागत पद्धत सुरू ठेवावी ही मागणी योग्य असून वैजनाथ मंदिर विश्वस्त समिती व त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या पुरोहित संघाने भाविकांची सोय लक्षात घेऊन आपसात योग्य समन्वय साधावा अशी मागणी समस्त भाविक वर्ग, परळीकर व आम जनतेतून होत आहे.

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पंचम ज्योतिर्लिंग असल्याने प्रभू वैजनाथ मंदिरातील महत्त्व व पावित्र्य भाविक वर्गामध्ये खूप मोठे आहे बीड जिल्हा नव्हे तर राज्य व परराज्यातूनही मोठा भाविक वर्ग या ठिकाणी दर्शनासाठी येत असतो बाहेरून येणाऱ्या तसेच स्थानिक भाविक वर्गाची अभिषेक करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे परंतु मागील काही दिवसा पूर्वी वैद्यनाथ देवल कमिटी विश्वस्थांनी पुरोहित संघांना जाचक अटी घालून दिले आहेत. यामुळे पुरोहित वर्ग संतप्त असून पूर्वीप्रमाणेच अभिषेक चालू ठेवावेत व पुरोहित संघाला दिलासा द्यावा अशी मागणीचे निवेदन पुरोहित संघाने तहसीलदार यांच्यामार्फत संबंधितांना दिली आहे. हे सर्व चालू असताना सकाळचे अभिषेक बंद असल्यामुळे भाविक वर्गातही मोठा असंतोष व नाराजीचा सूर उमटला आहे .


*पावसाचे प्रमाण वाढावे म्हणून वैद्यनाथ प्रभूस पाणी अर्पण करण्यात यावे*


पावसाचे अत्यल्प प्रमाण पाहता समस्त भाविकांचे प्रभुवैद्यनाथाला कावडीद्वारे व कळसाद्वारे अभिषेक करण्याची परंपरा आहे यामुळे पृथ्वीवर पावसाचे प्रमाण योग्य राहील अशी भाविकांची धारणा व श्रद्धा असते त्यामुळे पुरोहितांद्वारे अभिषेक व पाणी घालण्याची परंपरा चालू ठेवावी अशी ही मागणी श्री अभय कुमार ठक्कर यांनी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार