महिला व मुलींच्या स्वरक्षण शिबिर तथा संस्कार वर्गाचा वृक्षारोपण करून समारोप सोहळा

महिला व मुलींच्या स्वरक्षण शिबिर तथा संस्कार वर्गाचा वृक्षारोपण करून समारोप सोहळा 



  (परळी वै) :प्रतिनिधी

                           येथील महर्षी दयानंद व्यायाम शाळा, आर्य समाज यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महिला व मुली स्वसंरक्षण शिबिर तथा संस्कार वर्गाचा समारोप सोहळा पालकांच्या आणि असंख्य शिबिरार्थ्यांच्या उपस्थितीत हर्ष उल्हासात संपन्न झाला. *चांगल्या सवयीने चांगला माणूस घडतो व चांगला माणूस चांगले राष्ट्र घडवतो* हेच जणू काही ब्रीदवाक्य असलेल्या आर्य समाज परळी च्या अध्यक्ष श्री जुगलकिशोरजी लोहिया,मंत्री श्री उग्रसेन राठोड व सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शहरातील मुली व महिला साठी हे सुसंस्कृत,गुणवान,चरित्रवान, बुद्धिवान व बलवान व्हावेत या उदात्त हेतूने आर्य समाज परळी वैजनाथ अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात अनेक बालिका व युवत्नी अगदी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला होता. या शिबिरात तज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने  शिबिरार्थ्यांना शारीरिक व्यायाम, कसरती, रोप मल्लखांब, दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी, लाठी-काठी व विविध खेळाद्वारे शारीरिक व बौद्धिक विकास साधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा या विविध अंगांनी यशस्वी ठरलेल्या या शिबिराचा समारोप सोहळा दिनांक 12 जून 2024 रोजी परळी येथील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

        याप्रसंगी या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रशांतकुमारजी शास्त्री (उपमंत्री,आर्य समाज परळी वै) श्री. सितारामजी भंडारी (प्रसिद्ध व्यापारी) यांची प्रमुख उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिबीरप्रमुख श्री. देविदासरावजी कावरे सर यांनी भूषवले. यावेळी श्री. प्रशांतकुमार जी शास्त्री पुढे बोलताना म्हटले की, "निरोगी शरीरात निरोगी मन वास करत असते" तर हे निरोगी शरीर आपणास शारीरिक कसरत, व्यायाम करूनच प्राप्त होत असते. तर त्याबरोबरच निरोगी मनावर योग्य ते संस्कार होणेही गरजेचे असते. अशा या शिबिराच्या व संस्कार वर्गा चे आयोजन करणे हे निश्चितच उल्लेखनीय कार्य आर्य समाज परळी वैजनाथ तर्फे पार पाडण्यात आले. यावेळी शिबिरार्थ्यांना पोषक आहाराचेही वाटप करण्यात आले. या शिबिरास तज्ञ महिला प्रशिक्षक म्हणून सौ. गोदावरी जगदीश कावरे मॅडम यांनी आपले कार्य उत्स्फूर्तपणे पार पाडले.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री. देविदासराव जी कावरे सर यांनी आपल्या प्रस्ताविक भाषणात महर्षी दयानंद व्यायाम शाळा,  परळी च्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. यात मुलींचे आत्मरक्षा शिबिर घेतली जातात. मुलांचे कुस्ती प्रशिक्षण शिबिरे घेतला जातात‌‌. त्याच बरोबर शासकीय तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धा येथे भरवल्या जातात.लाकडी मल्लखांब,टांगता मल्लखांब याचे देखील प्रशिक्षण शिबिर येथे भरवले जाते. त्याचबरोबर जागतिक मल्लखांब दिन,जागतिक क्रीडा दिन, जागतिक योग दिन, हेच नव्हे तर क्रीडा क्षेत्राशी निगडित असे अनेक कार्यक्रम व्यायाम शाळेद्वारे येथे राबवले जातात. याची. सविस्तर माहिती व ही व्यायाम शाळा कधी स्थापन झाली. त्या काळापासून आस्था गत या व्यायाम शाळेचा थोडक्यात इतिहास त्यांनी सर्वांसमोर मांडला. तसेच मान्यवरांचे व शिबिरार्थी मुलींचे या शिबिरात उस्फूर्तपणे सहभाग नोंदवला त्याबद्दल यांनी आनंद व्यक्त केला. तर आपल्या खुमासदार शैलीत प्रा.डॉ.जगदीश कावरे सर यांनी सूत्रसंचालकाची भूमिका साकारली तर सौ.गोदावरी जगदीश कावरे मॅडम प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाच्या अध्यक्ष तसेच शिबीरार्थी मुलींचे पालक या सर्व मान्यवरांचे यांनी आभार मानले. अशा पद्धतीने या शिबिराचा व संस्कार वर्गाचा समारोप प्रसंगी आज जगासमोर ग्लोबल वार्मिंग ची समस्या आहे. त्यावर उपाय म्हणून सर्व शिबिरार्थी व मान्यवर यांनी मिळून वृक्षारोपण करून सर्वांना वृक्ष लागवडीचा संदेश देऊन अनेक वृक्षांचे वाटप सुद्धा करण्यात आले, तर अशा या आगळ्यावेगळ्या शिबिराची सांगता सार्वजनिक गायत्री मंत्र उच्चारन व शांती पाठ पठण घेऊन करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार