मंत्री पंकजा मुंडे यांची बदनामी केल्याची होती तक्रार
आपहरणाचा बनाव करणाऱ्या ज्ञानेश्वर इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल
मंत्री पंकजा मुंडे यांची बदनामी केल्याची होती तक्रार
केज :- प्रतिनिधी....अपहरणाचा बनाव करून पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्याबद्दल वक्तव्य करीत त्यांची बदनामी आणि दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा बातम्या प्रसारित केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर इंगळे (रा. कळमअंबा, ता. केज) याच्याविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
कळमअंबा (ता. केज) येथील ज्ञानेश्वर इंगळे याने १ जानेवारीला पहाटे ५ वाजेच्या सुमारास पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून २० लाख रुपयांचे पत्र आणायचे आहे, त्यासाठी पंकजा मुंडे यांना १० टक्क्याने २ लाख रुपये द्यायचे आहेत, असे सांगून दत्ता तांदळे यांनी मला मुंबईला जायचे म्हणून गाडीत बसवून नेले. अपहरण व मारहाण करून जवळील दोन लाख रुपये व मोबाइल काढून घेतल्याचे आणि लाख रुपये व मोबाइल काढून घेतल्याचे आणि पंकजा मुंडे यांना १० टक्क्याने २ लाख रुपये द्यायचे होते, असा उल्लेख करीत अपहरण केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांवर दिल्या. व्यवहारातून आपले अपहरण झाल्याचा बनाव करणाऱ्या इंगळे याने पंकजा मुंडे यांची बदनामी, तर दोन समाजात तेढ निर्माण केली अशी तक्रार भाजपचे केज तालुकाध्यक्ष भगवान केदार यांनी दिली आहे. यावरून केज पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा