केजनंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अपहरणाची घटना; परळीतील प्रतिष्ठित युवा व्यापाऱ्याचे अपहरण

 परळी वैजनाथ, पुढारी वृत्तसेवा..

       केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक प्रकार ताजा असतानाच काल (दि.9) रात्री परळी शहरातील प्रतिष्ठित युवा उद्योजक- व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. या अपहरण प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया परळी शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे.

       या खळबळजनक घटनेबाबत प्राथमिक माहिती अशी की, परळी शहरातील भाजपाचे ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव अमोल डुबे यांचे औद्योगिक वसाहत येथे उद्योग व व्यापारीपेढी आहे. नेहमीप्रमाणे ते काल रात्री आपल्या ऑफिसमधून बाहेर मोटरसायकलवर बसत असताना अज्ञात पाच ते सहा लोकांनी येऊन त्यांना बळजबरी उचलून गाडीत टाकले व अंबाजोगाईच्या दिशेने घेऊन गेले. दरम्यान त्यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत ती रक्कम सुपूर्द करा, मग तुम्हाला सोडून देतो असे त्यांना सांगण्यात आले. घाबरून जाऊन अमोल डुबे यांनी गळ्यातील सोनन्याची चैन,जवळील रक्कम व  आपल्या ड्रायव्हरला फोन लावून काही रक्कम आणून अपहरणकर्त्यांना दिली. त्यानंतर अंबाजोगाई रस्त्यावरील रामरक्षा गोशाळेच्या पुढे गेल्यानंतर या अपहरणकर्त्यांनी त्यांना सोडून देऊन अपहरणकर्ते  फरार झाले.

   चार ते पाच तोंडाला काळ्या पट्ट्या बांधलेले लोक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्या अपहरणाची घटना त्यांच्या ऑफिसच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. परंतु या घटनेने व्यापारी व परळी शहरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.याप्रकरणी आता परळी शहर पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने व्यापारी, नागरिक जमा झाले असुन या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. दरम्यान अमोल डुबे हे पंकजाताई मुंडे यांचे निकटवर्तीय भाजप ज्येष्ठ नेते विकासराव डुबे यांचे चिरंजीव असून एवढ्या प्रतिष्ठित उद्योजक व्यापारी परिवारातील मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडल्याने नागरिकात दहशत निर्माण झाली आहे. या प्रकरणाची अधिकृत अधिक माहिती व सविस्तर प्रकरण काय आहे हे पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतरच लक्षात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार