जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
परळीतील बहुचर्चित व्यापारी अपहरण प्रकरणातील आरोपी मुद्देमालासह परळी पोलिसांनी पकडले- जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा.....
परळी शहरातील युवा व्यावसायिक अमोल विकासराव दुबे यांचे अपहरण करून त्यांच्याकडून काही रक्कम घेऊन त्यांना सोडून देण्यात आले होते. या प्रकरणाची संपूर्ण राज्यात मोठी चर्चा व खळबळ झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या प्रकरणातील अपहरणकर्त्या आरोपींना मुद्देमाला सह पकडले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी परळीत पत्रकार परिषद घेऊन दिली. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी, एक रिवाल्वर सह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितले की,
पोलीस ठाणे परळी शहर गुरनं. 192/2024 कलम 126 (2),140(2),308(3),(4)(5), 351(2), (3),3 (5) बी.एन. एस. सहकलम 3/25 शस्त्र अधिनियम मधील फिर्यादी नामे अमोल विकासराव डुबे रा. टेलर लाईन परळी बे.ता. परळी जि. बीड, यांनी फिर्याद दिली की, दिनांक 09/12/2024 रोजी रात्री 09.00 ते 11.30 वा. दरम्यान अनोळखी पाच इसमांनी तोंडाला रुमाल बांधुन येवुन त्यांची मोटारसायकल अडवुन त्यांना गाडीत टाकुन जबरदस्ती घेवुन जावून बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याच्या धमक्या देवुन त्यांना कारमध्ये अपहरण करुन कनेरवाडी घाटामध्ये घेवून जावुन त्यांच्याकडुन खंडणी म्हणून त्यांच्याकडे असलेली नगदी 3,88,300/- च 10 तोळे सोन्याचे बिस्कोट किंमत अंदाजे 4,00,000/- असा एकूण 8,28,300/- रुपयाचा माल घेवुन गेले आहेत. बगैरे मजकुराचे फिर्याद वरुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
तपासी अंमलदार श्री.धनंजय ढोणे (पोलीस निरीक्षक संभाजी नगर, परळी वै,) यांनी तपास केला, आरोपी शोधकामी वेगवेगळे तपास पथके तयार करुन तांत्रिक माहितीचे अवलोकन करुन व गोपनीय बातमीदारांकडुन गोपणीय माहिती घेवून गुन्हा उघडकीस आणला. आयटी सेल बीडच्या मदतीने घटनास्थळाचे तांत्रिक माहितीचे मदतीने आरोपी येण्याजाण्याचा मार्ग शोधून काढून आरोपी निष्पन्न केले. या गुन्हयात आरोपी 1) चैतन्य पंढरी उमाप वय 24 वर्ष रा. पळसखेडा ता केज जि बीड ह.मु. परळीवेस, अंबाजोगाई जि बीड 2) सागर ऊर्फ बबलु शंभु सुर्यवंशी वय 22 वर्षे रा. आंबेडकर चौक आनंदनगर लातुर ह.मु. परळीवेस अंबाजोगाई 3) शंकर भगवान जोगदंड वय 22 वर्षे रा. साठे नगर परळीवेस ता. अंबाजोगाई 4) सचिन श्रीराम जोगदंड वय 25 वर्षे रा. साठे नगर परळीवेस ता. अंबाजोगाई 5) जय ऊर्फ सोनू संजय कसबे वय 26 वर्ष रा. सिध्दार्थ नगर परळी वै यांना अटक करण्यात आली. फिर्यादी यांचेकडुन खंडणीपोटी घेवुन गेलेले 10 तोळे सोन्याचे बिस्कीट 8,00,000/- रुपयाचे व नगदी 112,000/- रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुन्हयात फिर्यादीचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या कार स्वीफ्ट डीझायर किमती 2,00,000/- रुपये व टाटा पंच किमती 6,00,000/- असा एकुण 17,12,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला. आरोपी सचीन श्रीराम जोगदंड याचे ताब्यातुन गुन्हयात वापरण्यात आलेला गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. गुन्हयाचा मास्टर माइंड जय संजय कसबे याची गोपनीय माहिती मिळवुन तपास पथकाने त्यास पुणे येथे अटक केलेले आहे.
ही कामगीरी पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ नाचण, पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे, सहा. पोलीस निरीक्षक योगेश शिंदे ,सहा. पोलस निरीक्षक नितीन गड्डवार पोह/1253 नरहरी नगरगोजे,पोह/1224 बालाजी दराडे, पोह/562 भास्कर केंद्रे, पोह/1145 गोवींद येलमटे, पोह/1753 अंकुश मेंडके, पोना/1918 गोवींद भताने 1पोअं/1313 पंडीत पांचाळ, IT सेल बीड चे पोअं/2068 वीक्की सुरवसे यांनी पार पाडली आहे.
●गुन्हयाच्या तपास पथकाला 25 हजाराचे बक्षीस
दरम्यान या बहुचर्चित गंभीर गुन्ह्यात चोख कामगिरी बजविणाऱ्या पो.नि. धनंजय ढोणे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाला या कामगिरीबद्दल 25 हजार रुपये रोख रकमेचे बक्षीस जाहीर करण्यात आले. या बक्षिसाची रक्कम सन्मानपूर्वक जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या हस्ते या तपासी पथकाला सपूर्द करण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा